Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथे माजी सैनिकांचा सन्मान, विद्यार्थी गुणगौरव आणि हजारो महिलांच्या सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याने … साजरा झाला ‘शशिकांत ( आप्पा ) कदम’ यांचा आगळा वेगळा वाढदिवस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ ऑगस्ट) : पिंपळे गुरव येथे शुक्रवार दि . १९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि माजी नगरसेवक शशिकांत आप्पा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त 75 माजी सैनिक सन्मान सोहळा, सामूहिक रक्षाबंधन सोहळा तसेच विद्यार्थी गुणगौरव समारंभ व शैक्षणिक वर्ष २०२१- २२ या वर्षात इ . १० वी मध्ये ८० % पुढील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत MSCIT प्रशिक्षण या कार्यक्रमाचे रामकृष्ण मंगल कार्यालय , पिंपळे गुरव येथे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप, माजी महापौर माई ढोरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ११७ माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला, ११७ गुणवंत विद्यार्थ्यांचा व गुणगौरव तसेच महिला भगिनींच्या हस्ते शंकर जगताप, शशिकांत कदम तसेच इतर उपस्थित मान्यवरांना राखी बांधून सामूहिक रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला. यावेळी शशिकांत कदम यांच्या वतीने सर्व महिला भगिनींना भेट म्हणून साडी देण्यात आली. यावेळी महिलांनी गाण्याच्या ठेक्यावर डान्स आणि फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. या सर्व कार्यक्रमांनंतर आयोजक शशिकांत कदम यांच्या वतीने सर्वाना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, त्याचाही सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतल्याचे दिसून आले.

Google Ad

यावेळी माजी नगरसेवक सागर अंगोळकर, अंबरनाथ कांबळे, माधवी राजपुरे, उषा मुंढे, महेश जगताप, श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, शिवाजी कदम तसेच छत्रपती शिवाजी मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!