Google Ad
Health & Fitness Maharashtra crimes

होम कॉरंटाइन करीता मेडिकल बेड आयसोलेशन सिस्टीमची डीआयएटी कडून पुण्यात निर्मिती!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढत आहे . त्यामुळे विलगीकरण कक्षात बेडची आवश्यकता आहे . डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नोलॉजी ( डीआयएटी ) कडून आश्रयफ नावाची मेडिकल बेड आयसोलेशन सिस्टीमची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना खाटांच्या कमतरतेमुळे घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे , अशा रुग्णांसाठी हा बेड उपयुक्त आहे . या युनिटमध्ये बेड , टेबल आणि खुर्ची ठेवण्यास सक्षम असून , रुग्णांची गोपनीयता राखण्यासाठी हा पडदा तळापासून ३ फूटपर्यंत अपारदर्शक आहे .

त्याचबरोबर विलगीरकरणासाठी कमी खर्चाचे हे युनिट असून , त्याचा पुनर्वापर होऊ शकतो.या बेडला पूर्णपणे प्लास्टिक सारख्या विशिष्ट पडद्याने ( एन्व्होलप ) झाकण्यात आले आहे . त्यामुळे यातून विषाणू बाहेर पडत नाही . तसेच , पारदर्शक पडद्याच्या आतीलहवा फिल्टर व निर्जंतुकीकरण होऊन बाहेर काढण्यासाठी सक्शन पंप व नलिका देण्यात आली आहे . या सक्शन पंपमध्ये अतिनील ( यूव्ही ) फिल्टर देण्यात आले असून , या अतिनील फिल्टरद्वारे विषाणू नष्ट जातात , त्यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यात मदत होणार आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!