Google Ad
Editor Choice Front Health & Fitness

गृहसजावट करताना ‘या’ गोष्टींचा वापर टाळणे हिताचे; जाणून घ्या

महाराष्ट्र 14 न्यूज : प्रत्येकाच्या स्वप्नात आपले असे एक घर असते. आपला अनुभव, निरीक्षण, इच्छा, अपेक्षा यांनुसार आपले घर सजवत असतो. छोट असलं, तरी ते घर टापटीप, नेटके ठेवण्याचा प्रयत्न जो तो करत असतो. महिलांना तर गृहसजावटीची विशेष आवड असते. अगदी छोट्यातील छोटी गोष्टही लक्षात ठेवून आपलेपणाने ती प्रत्यक्षात आणण्याचा गृहिणींचा कल असतो.

भारतीय संस्कृतीत महाभारत हा पवित्र ग्रंथ मानला गेला आहे. महाभारताची मोहिनी युगांनंतरही आपल्यावर असलेली पाहायला मिळते. महाभारत युद्ध हा, तर अनेकांच्या अभ्यासाचा विषय. याच महाभारत युद्धाची सुप्रसिद्ध तसबीर अनेकांच्या घरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा अनेकांची तशी इच्छा असते. मात्र, वास्तुशास्त्रानुसार, महाभारत युद्धाची तसबीर घरात लावू नये, असे सांगितले जाते. महाभारत युद्ध कलह आणि हिंसेचे प्रतीक आहे. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या गाजलेल्या या महाभारत युद्धाच्या तसबिरीचा वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुटुंबात कलह, वाद वाढू शकतात, असे सांगितले जाते.

Google Ad

वास्तुशास्त्रानुसार, कब्रस्तान किंवा समाधी स्थळ दिसत असलेल्या तसबिरी घरात लावू नयेत, असे सांगितले जाते. एखाद्या चित्रात कब्र किंवा समाधी दिसत असल्यास ते चित्र किंवा तसबीर घरात लावणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढीस लागतो. कुटुंबातील सदस्यांनाचे नकारात्मक विचार वाढीस लागू शकतात. मानसिक शांतता भंग होऊ शकते. त्याचप्रमाणे अशा तसबिरी लावल्यामुळे कौटुंबिक वातावरण गढूळ होऊ शकते, असे सांगितले जाते.

वास्तुशास्त्रानुसार, घरात हिंसक तसबिरी लावू नयेत, असे सांगितले जाते. एखाद्या चित्राकडे पाहून ते हिंसक प्रवृत्तीचे द्योतक आहे, असे वाटल्यास ते चित्र तात्काळ काढून टाकावे, असे सांगितले जाते. अशा तसबिरींमुळे घरातील लहान मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. घरात वाद, भांडणे, मतभेद वाढीस लागू शकतात. तसेच कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतात, असे सांगितले जाते. तसेच काही जण बुडते जहाज असलेल्या तसबिरी गृहसजावट करताना शोभेच्या वस्तू म्हणून लावतात. काही जण टायटानिक जहाजाचा फोटो लावतात. मात्र, अशी चित्रे नकारात्मक संदेश देत असल्यामुळे घरात लावू नयेत, असे सांगितले जाते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!