Google Ad
Editor Choice

COVID-19 In India : गृहमंत्रालयाकडून देशातील सर्व राज्यं … केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या कंटेन्मेंट निर्देशांचे 31 मे पर्यंत पालन करण्याचे निर्देश

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्रीय गृहमंत्रालयाने आज (29 एप्रिल) एक आदेश जारी केला आहे, त्यानुसार सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना परिस्थितीचा लेखाजोखा घेऊन त्यानुसार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने 25 एप्रिल रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तात्काळ पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केलेल्या अंतरपालनाबद्दलच्या व इतर मार्गदर्शक संबधित सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने 25 एप्रिल 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी करुन राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी गेल्या आठवड्यात कोविड संसर्गाचे प्रमाण 10 टक्के वा त्याहून जास्त असेल किंवा उपलब्ध खाटांपैकी 60 टक्के खाटा भरलेल्या असतील असे जिल्हे निवडून त्यांना अतिदक्षता घेण्याजोगे विभाग म्हणून मानावे आणि तेथे संसर्ग रोखण्यासाठीचे स्थानिक मार्गदर्शक नियम लावावेत असे सांगितले आहे.

Google Ad

एकत्रित कंटेनमेंट क्षेत्र वा मोठे कंटेनमेंट विभाग यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत गृहमंत्रालयाच्या आदेशात सूचना दिल्या आहेत.कोविड19 व्यवस्थापनाबाबतच्या राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक सूचना संपूर्ण देशभर लागू असतील. दरम्यान गृहमंत्रालयाचा हा आदेश 31 मे 2021 पर्यंत अमलात असेल अशी देखील माहिती देण्यात आली आहे. INHS जीवंती, INHS पतंजली, INHS सांधणी

Google Ad

About the author

Maharashtra14 News

33 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!