Google Ad
Editor Choice Maharashtra

महाराष्ट्र्रातील या १८ जिल्ह्यात होम आयोलेशन बंद … कोणते आहेत, हे १८ जिल्हे?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५मे) : महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात होम आयोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृहविलगीकरणात असूनही अनेक रुग्ण सर्रास बाहेर फिरत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या घटण्याऐवजी वाढत आहे. परिणामी राज्य सरकारने आता गृहविलगीकरण बंद केलं आहे. अनेक कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुप्रर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत.

त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १८ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली.

Google Ad

▶️कोणते १८ जिल्हे?

बुलडाणा

कोल्हापूर

रत्नागिरी

सांगली

यवतमाळ

अमरावती

सिंधुदुर्ग

सोलापूर

अकोला

सातारा

वाशिम

बीड

गडचिरोली

अहमदनगर

उस्मानाबाद

रायगड

पुणे

नागपूर

▶️डोअर टू डोअर सर्वेक्षण

म्युकरमायकोसिस संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी हॉस्पिटल्सची बैठक बोलावली. म्युकरमायकोसिस रुग्ण शोधण्यासाठी जिल्हा प्रशासन डोअर टू डोअर सर्वेक्षण करणार आहे. म्युकरमायकोसिसचे बाहेरील जिल्ह्यातील १९ रुग्ण सध्या पुण्यात उपचार घेत आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यातील ५३ हॉस्पिटलमध्ये ५९१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात म्युकरमायकोसिससाठी २८६० इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील २०७ रुग्णांनी आतापर्यंत महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलाय, असंही त्यांनी सांगितलं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

240 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!