Google Ad
Editor Choice

हॉकी स्टिकने दुकानांतील सामानाची तोडफोड … चार अल्पवयीन मुलांचा येरवड्यात हैदोस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ ऑक्टोबर) : येरवडा जयप्रकाश नगर येथे चार अल्पवयीन मुलांनी दोन दुकाने फोडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दहशत माजवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील येरवडा परिसरात दहशत माजवण्याच्या दृष्टीने असेच अनेक छोटे मोठे प्रकार वारंवार घडत असतात.

या घटनेमुळे पुन्हा एकदा येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुकानदार दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच चार जणांनी येऊन हॉकी स्टिकने दुकानातील सामानाची तोडफोड केली. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला हे अद्याप समजू शकले नाही.

Google Ad

यापूर्वीही असे अनेक प्रकार येरवडा परिसरामध्ये झालेले आहेत. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. अवैध धंदे आणि अशा युवकांचे टोळके हे दहशत माजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. दहशत माजवणाऱ्यांच्या विरोधात येरवडा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार करण्यात येत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!