Google Ad
Uncategorized

संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघा चा भंडारा डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रमात हिरीरीने सहभाग

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जुलै) : मराठवाडा जनविकास संघाने भंडारा डोंगर येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात पिंपळे गुरव काशीद पार्क भागातील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघातील महिला पुरुष बंधू भगिनींनी हीरीरीने सहभागी होऊन जवळजवळ पाचशे रोपट्यांचे वृक्षारोपण भंडारा डोंगरावर करण्यात आले.

यावेळी संघातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे नुकताच ज्यांना स्वच्छता चॅम्पियन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असे श्रीकृष्ण जी फिरके हे या संघाचे अध्यक्ष असून यांच्या अध्यक्षतेखाली सदर वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी संघातील अनेक सभासदांनी भंडारा डोंगरावर मूर्त स्वरूपात येत असलेले श्री संत तुकाराम महाराजांचे सुंदर मंदिरासाठी आर्थिक मदतही केली, त्याचे धनादेश मंदिराचे विश्वस्त बाळासाहेब काशीद व जगन्नाथ पाटील यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

Google Ad

संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गेले कित्येक वर्षापासून स्वच्छता मोहीम ,अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, हरिपाठ, वाचनालय, विरंगुळा केंद्र गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप रक्षाबंधन कार्यक्रम तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनेक योजनांच्या माध्यमातून उस्फूर्त असे अनेक कार्यक्रम केले जातात यावर्षी केलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सर्वत्र त्यांचे व संघाचे अध्यक्ष माननीय श्रीकृष्ण फिरके यांचे अभिनंदन होत आहे.

या कार्यक्रमासाठी संगीता विधाते, सुनिता जाधव, सुनिता देशपांडे ,कुमुद फिरके, लता इंगळे, अलका पाटील, सुमन दिघे, शशिकला भागवत,प्रा,जितेंद्रजी पांडे, ,सूर्यकांत भागवत, प्रकाश चिटणीस ,चांदमल सिंघवी, सुरेश दिघे, दामू राणे, या ज्येष्ठांनी उपस्थित राहून परिश्रम घेतले हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी पार F फिरके व प्रल्हाद झरांडे यांनी विशेष प्रयत्न व परिश्रम घेतले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!