Categories: Editor Choice

वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील चोराला हिंजवडी पोलीसांनी ठोकल्या बेडया … त्याचेकडून १५ चोरलेल्या दुचाकी जप्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ जुलै) : वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील चोराला हिंजवडी पोलीसांनी ठोकल्या बेडया त्याचेकडून १५ चोरलेल्या दुचाकी जप्त . वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता मा . श्री अंकुश शिंदे सो पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय , धांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी उपाय योजना राबविण्यास सांगितल्या असताना हिंजवडी पोलीस ठाणे यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर यांनी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांना वाहन चोरीचे गुन्हे प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने व तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सुचना व मार्गदर्शन केले.

त्यानुसार  वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे बावधन चौकीचे मर्शलवरील सहा पोलीस उपनिरीक्षक साळुंके व पोलीस हवालदार ८२ ९ सावंत हे पोलीस मित्र नामे गिरीष गायकवाड यांचेसह हे बावधन परिसरात रात्रगरत करीत असताना त्यांना एक इसम हा रामनगर बावधन परिसरात संशयीत रित्या फिरतांना दिसल्याने त्यास त्यांनी ताब्यात घेवून त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचा नाव व पत्ता असिफ शेरखान पठाण वय २१ वर्षे रा . मु.पो. सुसगाव , शेख कॉलेजवळ ता . मुळशी जि.पुणे मुळगाव टाकळी सिंकदर ता . मोहोळ जि . सोलापुर असा असल्याचा सांगितला असता त्यास सदर परिसरात फिरण्याचे कारण विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवून त्याचेवरील संशय अधिक बळावल्याने त्याचेकडे कसुन विचारपुस केली असता तो सदर परिसरात मोटार सायकल चोरी करण्यासाठी आल्याचे सांगितले .

त्यास ताब्यात घेवून तपास पथकातील सहा . पोलीस निरीक्षक सागर काटे , राम गोमारे व तपास पथकातील अंमलदार यांनी असिफ पठाण याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने त्याचा साथीदार नितीन पांडुरंग साबळे रा . सुसगाव पुणे याचेसह हिंजवडी पोलीस ठाणेकडील गु.र.नं. ६६०/२०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे दाखल गुन्हा व इतर गुन्हे केल्याचे कबुल केल्याने त्यास हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं .६६० / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडे अटक मुदतीत तपास केला असता त्याने व त्याचे इतर दोन साथीदार पाहिजे आरोपी नामे नितीन पांडुरंग साबळे रा . सुसगाव पुणे व अनिकेत अमर ढगे रा . सुसगाव पुणे यांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरातील खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे .

१ ) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं .६६० / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे . २ ) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ४०० / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे . ३ ) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.र.नं .७० / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे . ४ ) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.र.नं .७२ / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे . ५ ) सिंहगड पोलीस ठाणे गु.र.नं .३०८ / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे . ६ ) सिंहगड पोलीस ठाणे गु.र.नं .३० ९ / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे . ७ ) भा . विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.नं .३५३ / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे . ८ ) भा . विदयापीठ पोलीस ठाणे गु.र.नं .४७ ९ / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे , 2 ९ ) दत्तवाडी पोलीस ठाणे गु.र.नं .१६७ / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे . १० ) कोथरुड पोलीस ठाणे गु.र.नं. १४७/२०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे . ११ ) चंदननगर पोलीस ठाणे गु.र.नं .२५४ / २०२२ भा.द.वि.कलम ३७ ९ प्रमाणे , १२ ) वारजे पोलीस ठाणे गु.र.नं .२७२ / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे . १३ ) वाकड पोलीस ठाणे गु.र.नं .३५२ / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे येणेप्रमाणे दाखल गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

त्यांचेकडुन वरील गुन्हयातील चोरीस गेलेल्या १३ व २ | बिनधनी मोटार सायकल अशा एकुण ४,४५,००० / – रुयपे किंमतीच्या १५ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत . तसेच यातील अटक आरोपी याचे इतर साथीदार नामे नितीन पांडुरंग साबळे व अनिकेत अमर ढगे यांचेवर पुणे | शहरात विविध पोलीस ठाणेत अनेक गुन्हे दाखल असुन पाहिजे आरोपी नामे अनिकेत अमर ढगे यांचेवर बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर यांनी मोका कायदयांतर्गत सन २०१७ मध्ये कारवाई केली आहे . सदरची कामगीरी मा . श्री अंकुश शिंदे सोो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय , मा . श्री संजय शिंदे सगे अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय

मा . श्री आनंद भोईटे सारे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय , मा . श्री श्रीकांत डिसले सो सहा . पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय , मा.श्री डॉ . विवेक मुगळीकर सरो , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तावल व मा . श्री सुनिल दहिफळे , सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सो , हिंजवडी पोलीस ठाणे , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील सागर | काटे , राम गोमारे सहा . पोलीस निरीक्षक , सहा . पोलीस उप निरीक्षक बंडु मारणे , नितीन साळुंके , बाळकृष्ण शिंदे , पो हवा , आबा सावंत चापु धुमाळ , कैलास केंगले , विक्रम कुदळ , योगेश शिंदे , पोलीस नाईक रितेश कोळी , अरुण नरळे , श्रीकांत चव्हाण , चंद्रकांत गडदे , पोलीस शिपाई अमर राणे , कारभारी पालवे , ओमप्रकाश कांबळे व दत्तात्रय शिंदे व परिमंडळ २ ऑफिसचे पोलीस उप निरीक्षक पवार व पोलीस शिपाई पंडीत यांनी केली .

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago