Google Ad
Editor Choice

वाहन चालकास मारहाण करुन त्याची चारचाकी गाडी जबरदस्तीने घेवून जाणाऱ्या दोन अनोळखी इसमाना ४ तासात हिंजवडी पोलीसांनी केली अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१मे) : दिनांक ३०/०४/२०२२ रोजी रात्री ०१.०० वा चे सुमारास फिर्यादी हे डांगेचीकाकडून हिंजवडीकडे त्यांची आय २० चारचाकी गाडी मधुन जात असतांना भुमकरचौकाच्या पुढे आल्यानंतर रस्त्याने विरुध्द दिशेने समोरुन एका ज्युपीटर मोटार सायकलवर दोन अनोळखी इसम आले व त्यांनी मोटार सायकल फिर्यादी यांचे गाडीला धडक दिल्याचे बहाना करुन फिर्यादी यांना दमदाटी करीत असताना फिर्यादी हे तेथे न थांबवता तेथुन निघुन लक्ष्मी चौक किर्ती गेट येथे गेले असता सदर दोन अनोळखी इसम यांनी मोटार सायकलवरुन फिर्यादीचा पाठलाग करुन त्यांना आडवुन लाथाबुक्यांनी मारहान करून त्याचे डोक्यात दगड मारुन जखमी करुन फिर्यादी यांची आय २० चारचाकी कार हि जबरदस्तीने चोरुन घेवुन गेले आहेत .

अशी दोन अनोळखी इसमांविरुध्द विरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेने गु . रजि . नं ३८५ / २०२२ भा.द.वि.क. ३ ९ ४.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन दाखल गुन्हा उघडकीस आणणेबाबत हिंजवडी तपास मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हिंजवडी पोलीस स्टेशन यांचे वरीष्ठांनी दाखल पथकाला सुचना दिल्या . डॉ . विवेक मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहा . पो . नि . सागर काटे व राम गोमारे यांना दाखल गुन्हा उघडकीस आण्यासाठी सुचना केल्या . सदर गुन्हयाचा सीसी टिव्हीच्या आधारे व तांत्रीक विश्लेषणाद्वारे तपास करत असतांना सहा . पो . नि . सागर काटे यांना बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , दाखल गुन्हयातील संशयित इसम हे डांगे चौक भागातील राहणारे असुन ते डांगेचौक येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने डांगे चौक भागात सापळा लावुन संशयित विशाल दामोदर पिल्ले यास आय २० कारसह ताब्यात घेतले त्याचेकडे दुसऱ्या साथीदारबाबत चौकशी केली असता त्याचा साथीदार प्रकाश यादव रा . रहाटणी काळेवाडी यास काळेवाडी फाटा येथुन ताब्यात घेतुन दोघांकडे दाखल गुन्हयांत अटक केली आहे .

Google Ad

सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन गुन्हयांतील दोन्ही आरोपी यांना ४ तासाच्या आत अटक करून गुन्हयात चोरीस गेलेल्या २,००,००० / – रुपये किमतीच्या आय २० कार हस्तगत केली आहे . सदर आरोपीचे नावे १ ) प्रकाश हरिराम यादव वय २६ वर्ष रा . रहाटणी फाटा काळेवाडी पुणे . २ ) विशाल दामोदर पिल्ले वय २४ वर्ष रा . डांगचीक वाकड पुणे असे असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि खटाळ हिंजवडी पोलीस स्टेशन हे करत आहेत .

सदरची कारवाई मा . श्री अंकुश शिंदे सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मा . डॉ संजय शिंदे सो , अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मा . आनंद भोईटे , पोलीस उप आयुक्त परि २ पिंपरी चिंचवड मा . श्रीकांत डिसले सहा पोलीस आयुक्त , वाकड विभाग वाकड , यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर , सुनिल दहिफळे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , तपास पथकाचे प्रमुख सपोनि , सागर काटे , राम गोमारे , अजितकुमार खटाळ , सपोफी महेश बायबसे , बंडु मारणे , पोलीस अंमलदार कैलास केंगले , कुणाल शिंदे , रितेश कोळी , अरूण नरळे , चंद्रकांत गडदे , श्रीकांत चव्हाण , कारभारी पालवे , ओमप्रकाश कांबळे , अमर राणे , दत्ता शिंदे , सुभाष गुरव यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!