Google Ad
Articles Editor Choice

Keral : १८ व्या वर्षीच लग्नानंतर पतीनं सोडलं … घरच्यांनीही काढलं बाहेर , महिला पोलिसाची प्रेरणादायी कथा!

महाराष्ट्र 14 न्यूज : केरळ पोलिसांतील महिला उपनिरीक्षक  अॅनी शिव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून तिच्या संघर्षाची कथा इतरांनाही प्रेरणा देणारी आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा त्यांच्या पतीनं त्यांना सोडलं आणि कुटुंबीयांनीही त्यांना घराबाहेर काढलं. परंतु अॅनीनं हार मानली नाही आणि परिस्थितीशी झुंज देत त्या पोलीस उपनिरीक्षक झाल्या.

अॅनी शिवा कांजीरामकुलममधील केएनएम शासकीय महाविद्यालयातून पदवी घेत होत्या आणि याचदरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. मात्र, एका मुलाच्या जन्मानंतर पतीनं त्यांना सोडून दिलं. यानंतर त्या आपल्या घरी गेल्या मात्र कुटुंबातील सदस्यांनी त्यांना घरात घेण्यास नकार दिला आणि 6 महिन्यांचा मुलगा शिवसुर्यासह त्यांना घराबाहेर काढलं.

Google Ad

कुटुंबीयांनी घराबाहेर काढल्यानंतर अॅनी शिवा आपल्या मुलासह आजीच्या घराच्या मागे बांधलेल्या एका झोपडीत राहू लागली. तिनं स्वतःचा आणि आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी अनेक लहान मोठी कामे केली. यादरम्यान तिनं आईस्क्रीम आणि लिंबू पाणीही विकलं, डोर-टू-डोर डिलिव्हरी देण्याची कामेही केली आणि हँडीक्राफ्टची विक्रीही केली.

कठीण काळात अॅनीनं अनेक लहान-मोठी काम केली, मात्र मुलाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच तिनं शिक्षणही सुरुच ठेवलं. समाजशास्त्र (Sociology) या विषयात त्यांनी पदवी घेतली. अॅनी यांनी 2014 साली तिरुअनंतपुरमच्या कोचिंग सेंटरमध्ये अॅडमिशन घेतलं आणि एका मैत्रिणीच्या मदतीनं सब इन्स्पेक्टरची परीक्षा दिली. 2016 मध्ये तिला यश मिळालं आणि ती सिव्हिल पोलिस अधिकारी झाली. तीन वर्षानंतर म्हणजेच सन 2019 मध्ये त्यांनी उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता जवळपास दीड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी वरकला पोलीस ठाण्यात प्रोबेशनरी सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

अ‍ॅनी शिवा यांनी सांगितलं की, ‘माझं पोस्टिंग काही दिवसांपूर्वी वरकला पोलीस स्टेशनमध्ये झाल्याचं मला कळलं. ही अशी जागा आहे, जिथे मी माझ्या लहान मुलासह कित्येकदा अश्रू ढाळले आणि मला पाठिंबा देणारं कोणीही नव्हतं. अ‍ॅनीची कहाणी केरळ पोलिसांनीही शेअर केली असून ट्विट केलं की, ‘इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाचं खरे मॉडेल. पती व कुटुंबीयांनी सोडून दिल्यानंतर 18 वर्षीय तरुणी आपल्या 6 महिन्यांच्या मुलासह रस्त्यावर आली. आता ती वरकाळा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक झाली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

57 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!