बाळाला भासते आहे दुधाची कमतरता? मग ‘या’ पदार्थांच्या सेवनाने वाढवा ब्रेस्ट मिल्क!

महाराष्ट्र 14 न्यूज : आई बनणं ही अतिशय गोड भावना असली तरी आई या नावासोबत एका स्त्रीवर अनेक जबाबदा-या देखील येतात. एका नवजात बाळाच्या आईची भूमिका निभावताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या बाळाला सुदृढ आणि निरोगी बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं. बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि चांगल्या विकासासाठी सगळ्यात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे आईचं दूध! असं म्हटलं जातं की या जगातील कोणत्याही सर्वोत्कृष्ट आहारालाही आईच्या दुधातील पोषक तत्व कोसो दूर फेकू शकतात.

ओट्स आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असतात. ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी तुम्ही दररोज आपल्या नाश्त्यात ओट्सचा समावेश करु शकता. ओट्समध्ये फायबरची मात्रा अधिक प्रमाणात असून त्यातून भरपूर प्रमाणात एनर्जी देखील मिळते. ओटमीलचा नाश्ता बनवणं फारच सोपं असल्यामुळे तुम्ही दररोज त्याचे सेवन करु शकता. तसेच ओट्समध्ये कार्बोहायडेट्स आणि फोलिक अॅसिडदेखील असते. ओट्य ताणतणावापासूनही दूर ठेवतात जेणेकरुन तुम्ही अगदी फ्रेश मुडमध्ये बाळाला स्तनान करु शकता आणि आईने फ्रेश राहून केलेलं स्तनपान बाळाला अनेक फायदे मिळवून देतं.

पालक खाल्ल्याने शरीरातील लोहाची मात्रा वाढते. पालकमध्ये फोलिक ॲसिड आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. त्यामुळे हे तत्व बाळाला आणि आईला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. पालकच्या नियमित सेवनाने आईचे दूध वाढवता येते. पालकच्या भाजीमध्ये प्रथिने, कर्बोदके, बीटा कॅरोटीन, संतृप्त आणि असंतृप्त फॅटी आणि सेंद्रिय ॲसिड, जीवनसत्त्वे अ, ब, क, ई आणि फायबर सारखे गुणधर्म असतात जे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लाभदायक असतात.

स्तनांतील दूध वाढवण्यासाठी महिला बडीशेपचे देखील सेवन करु शकतात. कारण बडीशेप ही पचनक्रिया सुधारण्याचं काम करते. तुम्ही जेवनाच्या वर टाकून बडीशेप खाऊ शकता किंवा बडीशेपचा चहादेखील तुम्ही पिऊ शकता. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने तोंडाचा दुर्गंधही दूर होतो. दुधाचा पुरवठा वाढविण्यासाठी तसेच गॅस आणि पोटदुखी कमी करण्यासाठी देखील बडीशेप वापरतात. असे मानले जाते की बडीशेप खाल्ल्यास त्याचे फायदे आईच्या दुधातून बाळापर्यंत पोहोचतात. म्हणूनच एक चमचा बडीशेपच्या बिया एक ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी प्यावे.

ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी सर्वात रामबाण उपाय हा लसूण आहे. लसणात असे तत्व असतात जे दूध बनण्यास मदत करतात. त्यासोबतच लसूण खाल्ल्याने महिलांना अनेक प्रकारच्या कर्करोगांपासून मुक्ती मिळते. लसणाच्या काही पाकळ्या शिजवून त्या सूप किंवा भाजीमध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता. तसेच तुळशीचे पाने ऑंटीऑक्सिडेंट या गुणधर्माने युक्त असतात. तुळशीच्या पानांतील शितलता ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासोबतच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही उपयुक्त ठरतात. गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून ते प्या. रोज हे पाणी प्यायल्याने स्तनांतील दूध वाढते.

रताळी पोटॅशियम युक्त असतात. याव्यतिरिक्त रताळामध्ये कार्बोहाइड्रेट, विटामिन बी कॉम्‍प्‍लेक्‍स आणि विटामिन सी देखील असते. ही सर्व पोषक तत्व स्तनांमधील दूध वाढवण्यास मदत करतात. तुम्ही रताळांची स्मुथी बनवू शकता किंवा रताळं शिजवूनही खाऊ शकता. तसेच रताळं खूपच हेल्दी आणि टेस्टी असतात. उकडवून, भाजून रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळी-अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही नियंत्रण मिळवता येते. एक मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये सुमारे चार ग्रॅम फायबर असते. म्हणूनच इतक्या लाभदायक तत्वांनी परिपक्व रताळी बाळाची भूक स्तनपानातून सहज भागवण्यासाठी जरुर खावी.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

6 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

6 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago