Google Ad
Editor Choice Food & Drinks Front Health & Fitness

तुमच्यातही विसराळूपणा वाढतोय का? स्मरणशक्ती कशी वाढवायची सोपे उपाय !

महाराष्ट्र 14 न्यूज : बदलती जीवनशैली, करिअरमधील स्पर्धा, पौष्टिक आहाराचा अभाव इत्यादी गोष्टींचा आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या सर्व गोष्टींचा कधी कधी स्मरणशक्तीवर दुष्परिणाम होऊ लागतात. लहान वयामध्येच विसराळूपणा वाढत जातो. पण ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही. यावर वेळीच उपाय करा.

स्वतःशी बोलणं ही चांगली सवय आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. याला प्रॉडक्शन इफेक्ट असं म्हणतात. ऐकणं आणि बोलणं या दोन कृती एकाच वेळी पार पडत असल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

Google Ad

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या प्रक्रियेशी निगडित समस्या उद्भवण्याची शक्यता असू शकते. अलाबामा युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की, उच्च रक्तदाबामुळे मेंदूला रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी, स्मरणशक्ती कमी होते.

गाणं गाताना मेंदूचा उजवी बाजू वापरली जाते, त्यामुळे समस्येचं निराकरण करण्याची क्षमता वाढते. नवीन गाण्याचे शब्द लक्षात ठेवणं, कठीण असलं तरीही तो एक प्रकारचा व्यायाम आहे. त्या मेंदूला फायदा होतो.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!