Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी युवासेने कडून दापोडी, फुगेवाडीतील मुस्लिम बांधवाना मदतीचा हात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे सर्व नागरिकांची आर्थिक परिस्तिथी बिकट झाली आहे. शिवसेनेचे ८०% समाजकारण व २०% राजकारण या शिकवणीनुसार सामाजिक एकोपा व शांततेची शिकवन देणाऱ्या पवित्र रमजान ईद चा हा सण सर्व मुस्लिम समाज बांधवांना साजरा करता यावा या हेतूने पिंपरी युवा सेना विभागप्रमुख निलेश हाके यांच्या वतीने दापोडी, फुगेवाडी परिसरातील मुस्लिम बांधवांच्या घरी उद्या होणाऱ्या रमजान ईद निमित्त अन्नधान्य व शिरकुरमा साहित्य वाटप करण्यात आले.

तसेच निलेश हाके यांच्या वतीने ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा घरीच राहून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून ईद साजरी करण्याचे अवाहन करण्यात आले.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!