Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

हृदयद्रावक : सुनेने ब्लाउजने गळा आवळून केला सासूचा खून त्यानंतर मुलाने …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ मे) : प्रत्येक घरात या ना त्या कारणाने भांडण होत असतात. त्यासोबतच सासू-सुनेचं भांडण हे सुद्धा आपल्याला अनेकवेळा पाहायला मिळतं. मात्र पुण्यात सासू- सूनेच्या भांडणात सूनेने आपल्या सासूचा गळा आवळून खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील मावळ तालुक्यात तळेगाव शहरमधील टेल्को हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी सून पूजा शिंदे आणि तिचा पती मिलिंद शिंदेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मयत सासू बेबी शिंदे आणि सून पूजा शिंदे यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात पूजा शिंदेला राग अनावर न झाल्याने तिने ब्लाउजच्या साहाय्याने आपल्या सासूचा गळा आवळला. यामध्ये बेबी शिंदे यांचा मृत्यू झाला.

Google Ad

ब्लाउजने गळा आवळल्यामुळे बेबी शिंदे निपचित पडून राहिल्या. त्यानंतर सूनेने आपला पती मिलिंद शिंदेला याबाबत सांगितलं. दोघांनी संगणमत करून मरण पावलेल्या बेबी शिंदेंचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पोत्यात भरला आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून घराच्या छतावर ठेवला मात्र दोन दिवसांनंतर वास येऊ लागल्यामुळे आपण केलेला गुन्हा उघडकीस येणार या भीतीने दोघांनी मिळून मृतदेह पोत्यात भरून जवळच्याच एका झाडाझुडपात फेकून दिला.

दरम्यान, पोत्यात भरलेल्या मृतदेहाचा वास येऊ लागल्याने रहिवाशांनी तळेगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सूनेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीच्या सुरूवातीला पूजाने उडवाउडवीची उत्तरे दिलीत मात्र त्यानंतर तिने आपल्या सासूच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. आपल्या आईच्या खुनात मुलाचाही हात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

70 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!