महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ एप्रिल) : गरिबाला ही कोणीतरी वाली असतो, त्याचा प्रत्येय पहायला आणि अनुभवायला मिळाला. घाटपिंपरी ता.वाशी जि. धाराशिव येथील श्रीमती. इंदूबाई महादेव गायकवाड यांच्यावर पुणे येथील भारती हॉस्पिटल मध्ये आतड्याचे ऑपरेशन दिनांक ३१/०४/२०२३ रोजी करण्यात आले. ३१ मार्च रोजी २०२२ – २०२३आर्थिक वर्ष संपते, त्यामुळे भारती हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून ९१ हजार रुपये बिल आकारण्यात आले.
अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने व जमीन उपलब्ध नसल्याने जमिनीतील ही उत्पन्न नाही अशा भूमिहीन मुलांना हॉस्पिटलचे देयक देणे शक्य नव्हते. बिल कमी करण्यास हॉस्पिटल व्यवस्थापनाने स्पष्ट नकार दिला होता. पुण्यासारख्या शहरामध्ये ऐन वेळी मदतीला कोणी ही येणार नव्हते. सर्व मार्ग बंद झाले होते. अशावेळी एकमेव आधार मिळण्याची अपेशा होती, ती म्हणजे भूम परंडा वाशीचे आमदार व राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे होय …
गायकवाड कुटुंबातील सदस्य राहुल गायकवाड व ईश्वर गायकवाड यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना संपर्क करून, सदर विषय आरोग्यमंत्री सावंत यांच्या कानावर घातल्यावर त्यांनी आरोग्य अधिकारी श्री. रविंद्र अनभुले यांना सांगुन तात्काळ मदत करण्याची सुचना केली. भारती हॉस्पिटल आणि मंत्री सावंत यांचे पुण्यातील कार्यालय हाकेचे अंतरावर आहे.
सावंत यांच्या ऑफिस मधून हॉस्पिटल व्यवस्थापनास सुचना केल्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये आरोग्यमंत्री व त्यांच्या नियोजित व्यवस्थापनामुळे गायकवाड परिवारास तात्काळ मदत मिळाली. हॉस्पिटल व्यवस्थापनानेही अडचणीत असलेल्या परिवारास ९१ हजार रुपये देयक माफ केले. एवढ्या तत्पर मदत मिळाल्यामुळे परिवारातील गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी कात्रज येथील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयात जाऊन सावंत यांचे आभार मानले. यावेळी आभार व्यक्त करण्यासाठी आलेल्या सदस्यांकडून पुष्पहार व शाल आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वीकारले नाही.
“तुम्ही माझ्या परिवारातीलच आहात, त्यामुळे माझे आभार मानू नका. माझ्याकडे काम घेऊन या हार तुरे घेऊन येऊ नका” असे सावंत यांनी मोठ्या मनाने सांगीतले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…