Google Ad
Editor Choice Maharashtra

देशात आजपासून 256 जिल्ह्यात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य , महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश ? यादी एका क्लिकवर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६जून) : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. देशात आजपासून 256 जिल्ह्यात कुठल्याही प्रकरणाच्या सोन्याचे दागिने आणि वस्तूंवर आता हॉलमार्किंग असणं अनिवार्य करण्यात आलंय. हॉलमार्किंग हे सोनाच्या शुद्धतेचं प्रमाण आहे. आतापर्यंत हॉलमार्किंगची व्यवस्था ऐच्छिक ठेवण्यात आली होती. उपभोक्ता मामले मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उद्योग जगतातील प्रमुख लोकांच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

केंद्र सरकारने 2019 मध्येच सोन्याचे दागिने आणि सर्व प्रकारच्या कलाकृतींवर 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांसाठी म्हणजे 1 जूनपर्यंत वाढवण्यात आली. कोरोना संकटामुळे सोन्याची बाजारपेठ बंद असल्यामुळे ही मर्यादा 15 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Google Ad

▶️महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हॉलमार्किंग अनिवार्य?

अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर,सोलापूर, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर ठाणे, पुणे, मुंबई अशा 21 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे.

▶️सोनं खरं की खोटं कसं ओळखाल?

सोनं खरेदी करताना प्रत्येकाच्या मनात हे खरं आहे की खोटं असा प्रश्न येतो. त्यामुळेच आपण खरेदी करत असलेलं सोनं खरं आहे का हे तपासणं महत्त्वाचं आहे. हे ओळखणं आता सोपं झालंय. 15 जून 2021 पासून सोन्याच्या दागिण्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलंय. या हॉलमार्कसह 4 चिन्ह तपासून तुम्ही सहजपणे खरं आणि खोटं सोनं ओळखू शकता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!