बावधन, पुणे येथे ह.भ.प. सुदामराव आण्णा दगडे यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा किर्तन सेवा निमित्ताने तुकोबारायांच्या मंदिरासाठी १,११,१११/- रुपये मानधन देणगी प्राप्तमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१८ मे) : बावधन, पुणे येथील एल.एम.डी. चौक ज्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे त्या कै. लक्ष्मणराव यांचे कर्तुत्ववान सुपुत्र सुदामराव आण्णा दगडे पाटील यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात वारकरी संप्रदायात आदराचे स्थान असणारे शांताराम आण्णा निम्हण यांच्या आग्रहाने ह भ प पंकज महाराज गावडे यांची किर्तन सेवा मोठ्या संख्येने असणाऱ्या भाविक भक्त, टाळकरी, गायक, वादक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थित संपन्न झाली.
या प्रसंगी खडकवासला विधानसभा आमदार भिमराव आण्णा तापकीर, मा.नगरसेवक दिलिप आण्णा वेडे पाटील, मा.नगरसेवक किरण भाऊ दगडे पाटील, पेरीविंकल ग्रुप चे उद्योजक राजेंद्र जी बांदल साहेब, मा.नगरसेविका ज्योत्स्ना ताई वर्पे, मा. सरपंच बबनराव दगडे पाटील, संत तुकाराम कारखान्याचे संचालक दिलिप आण्णा दगडे पाटील, मा.नगरसेवक प्रकाश जी गलांडे पाटील, मित्र रंगनाथ जी गलांडे पाटील, मित्र नितिन जी निम्हण, मित्र राजेश जी विधाते, यश राजेंद्र बांदल आणि आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आण्णा यांचे सुपुत्र, मुली, पुतणे, सूना, नातवंडे यांनी फार मोठ्या आनंदाने हा सोहळा संपन्न केला.
परिवाराच्या वतीने आण्णा यांचे सुपुत्र शिवाजीराव दगडे पाटील यांनी पंकज महाराज गावडे यांच्या किर्तन सेवेनिमित्ताने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथिल जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिरासाठी १,११,१११/- रुपये मानधन देणगी म्हणून दिली, या साठी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट चे वतीने त्यांचे आभार व्यक्त केले, तर आमदार भिमराव आण्णा तापकीर यांनी असे किर्तन माझ्या आयुष्यात प्रथमच श्रवण केले आणि येथून पुढे कुठे ही किर्तन असेल तर मी सर्वात अगोदर येऊन बसणार कारण २ तास ३० मिनिटे चाललेले किर्तन मी १ तास ३० मिनिटे श्रवण केले, कारण यायला उशीर झाला परंतु किर्तन ऐकताना मोबाईल बंद केला आणि उर्वरित किर्तन ऐकताना अंगावर रोमांच उभे राहत होते आणि डोळे भरून येत होते आणि ही खरी किर्तन परंपरा असल्याचे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी गावडे महाराज यांच्या समवेत शब्दप्रेमी संग्राम बापू भंडारे महाराज, मृदुंगमणी व्यंकटेश आबा फड महाराज, गायनाचार्य प्रविण महाराज सोळंके सोबत होते. या वेळी यश राजेंद्र बांदल या महाराजांच्या लाडक्याने महाराजांची सर्व प्रवास व्यवस्था पाहिली या साठी महाराजांनी त्याला धन्यवाद दिले. तसेच आण्णा तुम्हांस उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य प्राप्त व्हावे ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे कृपेने पांडुरंगाचे चरणी प्रार्थनाही डॉ. पंकज महाराज गावडे यांनीश्री क्षेत्र भंडारा डोंगर च्या वतीने केली.
*चला बदलूया राष्ट्र घडवूया..!*