गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!!
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त होणारा आदरभाव… उपस्थित गुरुजनांचे प्रेरणादायी आणि जीवनदर्शी मार्गदर्शन… माननीय अजित दादा पवार यांच्या उपस्थितीने वाढलेली कार्यक्रमाची उंची… तुडुंब भरलेले गणेश कला क्रीडा सभागृह… बाहेर कोसळणारा पाऊस… आणि मौलिक विचारांनी चिंब झालेली मने असा एक अनुपम सोहळा अर्थात गुरुजन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न झाला.
चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर आणि ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांना मा. अजितदादा व मोनिकाताई मोहोळ यांच्या हस्ते गुरुजन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, मोत्याची माळ, पुस्तके आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केलेल्या आलोक मनोज तोडकर या युवा खेळाडूला अजितदादांच्या हस्ते 51 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
गुरुजन गौरव सोहळ्याचे हे विसावे वर्ष! आजवरच्या वीस वर्षाच्या वाटचालीतील सुवर्णक्षणांना एकत्रित गुंफावे या भावनेने गुरुवंदना हे कॉफी टेबल बुक साकारण्यात आले. आजच्या समारंभात त्याचे शानदार प्रकाशन करण्यात आले.
नेहमीप्रमाणे कार्यक्रमासाठी अजितदादा वेळेत उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्या सर्वांच्याच आयुष्यात गुरूचे स्थान महत्त्वाचे आहे. गुरू हेच आपल्या समाजातील खरे दीपस्तंभ असतात. समाजातील अशा गुरूंचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे.
अरुणजी फिरोदिया, विजय कुवळेकर आणि शमा भाटे यांनीही उपस्थितांना मौलिक विचारांद्वारे मार्गदर्शन केले. या प्रसंगी व्यासपीठावर मोनिकाताई मोहोळ, विजय पांडुरंग जगताप, अंकुश काकडे, दीपक मानकर, दत्ता धनकवडे, रमेश बाप्पू कोंडे, जालिंदरभाऊ कामठे, भालचंद्र जगताप, अभयशेठ मांढरे पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील नगरसेवक व मान्यवर यांची विशेष उपस्थिती होती. युवराज रेणुसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
अनौपचारिक वातावरणात रंगलेला हा कार्यक्रम दीर्घकाळ स्मरणात राहावा असा झाला.
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…