Google Ad
Editor Choice Health & Fitness

‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांची पुण्यात शंभरी पार, कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ जानेवारी : राज्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चं थैमान वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातही ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चं रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात या आजाराचे रुग्ण शंभरी पार गेले आहेत.

या आजारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आता आजाराचे ४ नवीन रुग्ण हे कमला नेहरु रुग्णालयात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. ‘जीबीएस’ रुग्णांनी पुण्यात शंभरी पार केले आहे.

Google Ad

पुण्यातील कमला नेहरु रुग्णालयात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे ४ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. पुण्यातील रुग्णासाठी जीबीएस आजाराचे इंजेक्शन कमला नेहरु रुग्णालयात उपलब्ध आहेत. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार सुरु आहेत. पुण्यात आजपर्यंत जीबीएसचे १११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील खासगी रुग्णालयात सुद्धा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

▶️कुठल्या रुग्णालयात किती रुग्ण?

दिनानाथ रुग्णालय :- २६

ससून रुग्णालय :- २१

काशीबाई नवले रुग्णालय :- ०९

सह्याद्री डेक्कन :- ०७

पूना हॉस्पिटल :-०५

भारती विद्यापीठ :- ०४

वायसीएम :- ०४

पल्स हॉस्पिटल :- ०३

साईनाथ हॉस्पिटल :- ०३

डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय :-०२

ग्लोबल हॉस्पिटल :- ०२

श्रेयानस हॉस्पिटल :- ०२

पुण्यातील विविध भागातील इतर १३ रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्ण…

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले

दरम्यान, पुण्यात जीबीएस आजाराच्या वाढत्या घटनांबद्दल महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही. हा आजार एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असताना होतो. रुग्णांच्या संख्येत वाढ रोखणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे, असं आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!