Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महापालिकेत मानधनावर समूह संघटकांची नेमणूक करण्यात येणार … अनुभवधारक उमेदवारांनी येथे करा अर्ज!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २४ मे २०२२: – महापालिकेत मानधनावर समूह संघटकांची नेमणूक करण्यात येणार असून या पदाकरीता पात्र असणा-यांकडून महापालिकेने अर्ज मागवले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.  

महापालिकेच्या समाज विकास विभागात समूह संघटकांमार्फत या विभागाच्या विविध योजनांची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते. या योजनांमध्ये विविध कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. शहरातील महिला, दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी आणि मागासवर्गीय नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यासाठी समूह संघटक महत्वाची भूमिका बजावत असतात. विविध महिला बचत गट, अशासकीय संस्था, विविध घटकातील नागरिक आणि महापालिका यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करण्यासाठी तसेच समन्वय साधण्यासाठी समूह संघटक काम करत असतात.

Google Ad

सद्यस्थितीत महालिकेला ५ समूह संघटकांची आवश्यकता असून मानधनावर हि पदे भरली जाणार आहेत. सहा महिने कालावधी करीता हंगामी स्वरुपाची ही नियुक्ती असणार आहे.  यासाठी अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  पदाचे आरक्षण, अर्जाचा नमुना, शैक्षणिक अर्हता, अनुभव, सदर पद भरतीसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्याhttp://www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोकरभरती (recruitment) या सदरामध्ये प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

 नमुद केलेली अर्हता धारण केलेल्या अनुभवधारक उमेदवारांनी आपले अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिका, समाज विकास विभाग,मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, पिंपरी, पुणे ४११०१८ या पत्त्यावर दि.८ जून २०२२  पर्यंत प्रत्यक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने पोहोचतील अशा पध्दतीने पाठविण्यात यावेत. विहीत नमुन्यातील अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडण्यात याव्यात, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!