Google Ad
Editor Choice

न्यू सिटी प्राईडमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

यानिमिताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात सुमारे २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याना मोरया रक्तपेढी सेंटर चिंचवड यांच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात आले. कोरोना महामारीच्या संकटामुळे शहरातीलच नव्हे तर राज्यातील रक्त साठा कमी झाला आहे . त्यामुळे असे रक्तदान शिबिराची गरज असल्याची नगरसेविका निर्मला कुटे यांनी यावेळी उपस्थिताना सांगितले.

Google Ad

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते शांताराम भालेराव, तात्या शिनगारे, बी एस कांबळे, सुहास आंबेकर,गोरख रोकडे,डॉ निखील गायकवाड, सपना वेलेले  यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोरया रक्तपेढी सेंटर चिंचवडचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अरुण चाबुकस्वार म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोठे  योगदान दिले आहे , शाहिरीतून  व आपल्या पथनाट्यातून समाज प्रबोधन केले . त्याच बरोबर सर्वसामान्य माणसाला समजेल असे साहित्य निर्मिती केली आहे. सचिन कालसाईट यांनी सूत्रसंचालन केते तर तात्या शिनगारे यांनी आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!