Categories: Uncategorized

सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विद्याधर चाबुकस्वार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑगस्ट) : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विद्याधर चाबुकस्वार यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस शाळेचे उपमुख्याध्यापक श्री सचिन कळसाईत सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार सामाजिक कार्यकर्ते तात्या शिंनगारे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नाझमीन शेख व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

त्यांची पत्नी विठाबाई चाबुकस्वार यांची चार मुले व एक मुलगी अभ्यासात हुशार होते व त्यांच्या वडिलांनाही शिक्षणाच्या बाबतीत हलगर्जीपणा अजिबात चालत नसे. ते नेहमी काटेकोरपणे लक्ष देत असे. त्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागली. डॉ. वसंत चाबुकस्वार हे नौरोजी वाडिया कॉलेजमध्ये प्रिंसिपल आहेत. सुनबाई वैशाली चाबुकस्वार या मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत, संदीप चाबुकस्वार पुणे महानगरपालिकेमध्ये ज्युनिअर इंजिनिअर आहेत तसेच अरुण चाबुकस्वार यांनी हालाखीच्या परिस्थितीत असताना एक इंग्लिश मीडियम शाळा उभी केली.

प्रमोद चाबुकस्वार स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून मुलगी मुलगी प्रतिभा कांबळे या चाकण – कुरळी गावच्या उपसरपंच आहेत.हे गरीब परिस्थितीतून त्यांनी सर्व काही उभा केलं आहे भविष्यकाळात मोठी झेप घेऊन शाळेची सुसज्ज इमारत होणार असून गरीब व वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, सर्वांना शिक्षण या योजनेखाली विद्यार्थ्यांना अल्पदरात व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत असे मत तात्या शिनगारे यांनी मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा पवार मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रज्ञा शिरोडकर यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

3 days ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

3 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

3 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago