Google Ad
Editor Choice

दापोडीतील त्रैलोक्य बुद्ध विहारात स्वरूप सिंधु माई महिला बचत गटाच्या वतीने गौतम बुद्ध यांना मानवंदना व अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ मे) : त्रैलोक्य बौद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमा निमित्ताने स्वरूप सिधु माई महीला बचत गटाच्या माध्यमातून गौतम बुद्ध यांना महीलांनी पुर्व संधेला वैशाख पौर्णिमा २५ मे २०२१ रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी मेणबत्ती पेटून मानवंदना व अभिवादन नगरसेविका सौ स्वाती माई काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. यासाठी ही तिथी बुद्ध पौर्णिमा नावाने ओळखली जाते ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. ती म्हणजे, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते, असे सांगितले जाते. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जाते.

Google Ad

पिंपरी विधानसभा कार्यध्यक्षा स्वरूप सिधु माई महीला बचत गटाच्या अध्यक्षा जन्नतबी सय्यद व सर्व महीला बचत गटाच्या अध्यक्षा छाया मते, पुजा बुरूड, गौरी वंजारी, वंदना मते, रश्मी गायकवाड, अनिता अस्टगे, शितल शेलार, शांता गालफाडे, ज्योती खरे, ज्योती कांबळे, सुनिता जेटियार, शकुंतला साखरे, सारीका सुरवसे, सविता स्वामी, चंद्रकला जाधव, श्रध्दा मते, कांचन बोत्रे उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!