Google Ad
Editor Choice

नागपंचमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ ऑगस्ट) : ‘पावसाच्या रिमझिम सरींनी… चोहीकडे दरवळला मातीचा सुवास… यंदाची नागपंचमी साजरी करुयात खास…!’ या महिलांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे नागपंचमी हा सण पिंपळे गुरवमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पिंपळे गुरव प्रभागातील सर्व माता भगिनींचा नागपंचमी सणाच्या दिवशी आनंद द्विगुणीत करण्यासाठी संगीत खुर्ची, उखाणे व मेहंदी कोण वाटप यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नागपंचमी सणानिमित्त सांगवी काळेवाडी मंडल भाजपचे पिं. चिं. शहर महिला सरचिटणीस सौ. स्वाती शरद जाधव यांनी पिंपळे गुरव येथील जवळकर नगरमधील सिंहगड कॉलनीतील साई स्कूल शेजारील भाजप जनसंपर्क कार्यालयासमोर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संगीत खुर्ची, उखाणे घेणे व मेहंदी कोण वाटप करणे यासारख्या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. स्वाती जाधव यांच्या प्रभागातील महिलांनी या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दिला. नागपंचमी सणानिमित्त विविध खेळ महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते. या खेळाचाही आनंद अनेक महिलांनी लुटला.

Google Ad

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप, ज्योती कोळी, शीतल पाटील, सारिका शेळके, प्रतीक्षा शेळके, जयश्री गंगणे, सरिता धुमाळ, सीमा खिलारे, कुंदा आवताडे, शोभा यादव, सुवर्णा जेदवन, सुरेखा पाटील, विद्या पवार, नीता वाघे, कल्याणी जमदाडे, कल्पना भुजबळ, वंदना डोंगरे, सारिका साठे आदी मान्यवर व परिसरातील महिला उपस्थित होत्या.

नागपंचमी सणानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना सौ. स्वाती शरद जाधव यांनी सांगितले कि, महिलांना अशा विविध संधी दिल्याने त्यांच्या मधील कलागुणांना वाव मिळत असतो. सर्व महिलांचे यानिमित्ताने आभार व्यक्त करते. कार्यक्रमानिमित्त आलेल्या मान्यवरांचे देखील मनःपूर्वक स्वागत तसेच आभार व्यक्त करते.


सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी झेंडे वाटप करीत असताना राष्ट्रध्वजाचे त्यांनी याप्रसंगी महत्व पटवून दिले. परिसरातील महिलांना नागपंचमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल स्वाती जाधव यांचे अभिनंदन केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!