Google Ad
Editor Choice

मोदी सरकारचा मोठा दिलासा … पेट्रोल , डिझेल लीटरमागे इतक्या रुपयांनी होणार स्वस्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१मे) : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला असून केंद्रीय अबकारी कर कमी केला आहे. यामुळे देशात वाढणारी महागाई कमी होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा आहे.

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात  मोठी कपात केली असून पेट्रोल लीटरमागे ९.५० पैशांनी स्वस्त तर डिझेल प्रतिलीटर ७ रु. स्वस्त होणार आहे. अबकारीवरील कपातीचा पेट्रोल-डिझेल असोसिएशनने स्वागत केले असून ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात येणार असल्याचे समजते.

Google Ad

गेल्या काही दिवसांमध्ये क्रूड ऑईलच्या किंमती झपाट्याने खाली येत असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र कमी होत नव्हते. तसेच घरगुती सिलेंडर आणि सीएनजीच्या (CNG) किंमती गगनाला भिडल्या होत्या. घरगुती सिलेंडरच्या वाढणाऱ्या दरांबद्दल मध्यमवर्गीय आणि गृहिणी नाराज होत्या. अखेर मोदी सरकारने देशवासियांना मोठा दिलासा देत वर्षाला मिळणाऱ्या बारा सिलेंडर मागे दोनशे रूपयांची सबसीडी देण्याचाही निर्णय घेतला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!