Google Ad
Editor Choice

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ४१, ४४, ४५ मध्ये भव्य सेवा सप्ताहाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२४ जुलै) : पिंपळे गुरव येथे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चिंचवड विधानसभा आमदार मा. श्री. लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपळे गुरव, सांगवी येथे व्यायाम शाळा (ओपन जिम) लोकार्पण तसेच वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप तसेच माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पतरू इस्टेट फेज ३ व ट्रेझर पार्क येथे व्यायाम शाळा साहित्य (ओपन जिम) सोहळा पार पडला. तसेच काशीद पार्क, रामकृष्ण मंगल कार्यालय व नवी सांगवी साई चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले.

Google Ad

याप्रसंगी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंघोळकर, महेश जगताप, माजी नगरसेविका वैशाली जवळकर, शोभाताई आदियाल, सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप, बाळासाहेब देवकर, संजय जगताप, नवनाथ जांभूळकर, शिवाजी कदम, शशिकांत दुधारे, राहुल जवळकर, अमरसिंग आदियाल, सखाराम रेडेकर, अजय दूधभाते आदी भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!