Google Ad
Editor Choice Education

दापोडीतील गोयल महाविद्यालयातील एन .एस. एस.(N.S.S.) विद्यार्थ्यानी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नॅक कमिटीकडून कौतुक-विद्यार्थ्यांना दिली शाबासकीची थाप!!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ फेब्रुवारी) : दापोडी, पुणे येथील जनता शिक्षण संस्थेच्या, श्रीमती सी.के. गोयल कला वाणिज्य महाविद्याल याचे नॅक समितीकडून मूल्यांकन दिनांक ४ आणि ५ फेब्रुवारी२०२२ या दोन दिवसाच्या कालावधीत करण्यात आले. नॅक मूल्यांकनासाठी आलेल्या समितीमध्ये डॉ. रोहिणी प्रसाद, (प्र-कुलगुरू, छत्तीसगड) डॉ. अमरेश दुबे (दिल्ली) डॉ. बाबू तारीत(कर्नाटक), डॉ. वाय.व्ही. रामीरेड्डी,(आंध्रा) हे प्रमुख मान्यवर अतिथीहोते.

नॅक समितीसमोर दिनांक ४/२/२०२२ रोजी सायंकाळी४:३०ते५:३० यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या लोक कलेवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
महाराष्ट्रीय सांस्कृतिक परंपरेचे ओळख नॅक समितीतील प्रमुखांना व्हावी. यासाठी नेमून दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण पंधरा दिवस तयारी करून विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम संस्कृतीकार्यक्रम सादर केला.
या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या परंपरेवर आधारित पोवाडा,(छत्रपती शिवाजी महाराज-अफजलखान वध) भारुड(बुरगुंडा होईल बया ग! तुला बुरगुंडा होईल!!) ईशस्तवन(गणेश वंदना), कोळी नृत्य,(डोल डोलतय! वाऱ्यावर!) धनगर नृत्य,(काठी न घोंगड घेऊ द्या की र! मला बी जत्रला येऊ द्या की !) लावणी,(साताऱ्याची गुलछडी मी! मला रोखुन पाहू नका!!) हे विविध नृत्यप्रकार सादर करण्यात आले. सर्व कार्यक्रमांना नॅक समितीतील मान्यवरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Google Ad

कार्यक्रमाच्या शेवटी समितीतील प्रमुख मा. श्री. डॉ. अमरेश दुबे. यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले “गोयल महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम फारच उत्कृष्ट होता!, मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी विद्यार्थ्यांनी अतिशय मनापासून केली. आणि सुंदर कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा समजण्यास मदत झाली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित होण्यास नक्कीच मदत झाली. असून अविस्मरणीय असा हा कार्यक्रम होता”. असे गौरव उद्-गार काढून विद्यार्थ्यांना शाबासकी दिली व त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी पालक, प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन: राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे यांनी केले. सूत्रसंचालन: प्रा. भूषण बिरादास यांनी केले आभार: प्रा सिद्धार्थ कांबळे यांनी मानले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी व इतर सर्व प्राध्यापक/ प्राध्यापक इतर कर्मचारी या यांचे विशेष सहकार्य लाभले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!