Google Ad
Editor Choice

पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर येणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ फेब्रुवारी) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सोमवार 14 फेब्रुवारी रोजी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाईंच्या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात हे सर्व राजकीय दिग्गज एकत्र येतील.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, मंत्री छगन भुजबळ, उदय सामंत उपस्थित राहणार आहे. विद्यापीठातील मुख्य इमारती समोर सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

Google Ad

पुतळ्याचे काम आता पूर्ण झाले असून, परिसराचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरापूर्वीच सावित्रीबाईंच्या जन्मदिनी 3 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण प्रस्तावित होते. मात्र, राज्यपालांची वेळ घेण्यासाठी उशीर झाल्याने उद्‍घाटन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करत जयंती दिनीच उद्‍घाटन करण्याची मागणी लावून धरली होती.

पुणे शहरात हे सर्व राजकीय मंडळी एकाच व्यासपीठावर येण्याची पहिलीच वेळ असावी. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात ते ही विद्यापीठात कुलपतींच्या उपस्थितीत हे राजकीय धुरीण काय भाषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!