महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मार्च) : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता २०२३ मध्ये वाढ करण्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यावर कॅबिनेटने निर्णय घेतला असून पंतप्रधान कार्यालय काय करणार हे अद्याप जाहीर झालेले नाही, असे बोलले जात आहे. मात्र मीडियाच्या रिपोर्टनुसार, वाढीव महागाई भत्ता १५ मार्चला जाहीर होऊ शकतो, असं संबंधित विभागातील सूत्रांनी म्हटलं आहे. त्यामुळे 15 मार्च ही तारीख कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते
महागाई भत्ता हा सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगाराचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या मदतीने सरकार महागाईचा प्रभाव कमी करते. महागाईला सामोरे जाण्यासाठी डीएमध्ये वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वेळोवेळी सुधारणा केली जाते. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात दोनवेळा महागाई भत्त्यात वाढ करते. आता २०२३ मध्ये जानेवारीमध्ये महागाई भत्ता वाढणार होता, पण तो अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
१५ मार्चरोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषनेचं वृत्त
1 मार्च 2023 रोजी झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर आता केवळ सरकारचा शिक्का मिळणे बाकी असल्याचे बोलले जात आहे. १५ मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यात ४ टक्के महागाई भत्ता वाढीची घोषणा होईल, असा अंदाज आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत ीत ४ टक्के वाढ केल्यास ती एकूण ४२ टक्क्यांवर जाईल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३८ टक्के महागाई भत्ता दिला जात आहे.
प्रति महिना 7,560रुपयांनी पगारवाढ
महागाई भत्त्यात झालेल्या वाढीचा फायदा १ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार दरमहा 18,000 रुपये असेल तर डीएमध्ये 4 टक्के वाढ केल्यानंतर 720 रुपयांची वाढ होईल. सध्या दरमहा ३८ टक्के महागाई भत्ता ६,८४० रुपये आहे. महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवल्यानंतर तो 42 टक्के होईल, तर ही रक्कम दरमहा एकूण 7,560 रुपये होईल. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा ७,५६० रुपयांनी वाढू लागेल.