Google Ad
Editor Choice india Politics Sports

Kolkatta : क्रिकेटला रामराम , मग आमदार … आता थेट क्रीडा राज्यमंत्रीपदी वर्णी

महाराष्ट्र 14 न्यूज : देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करतोय. त्याच दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडली. राज्यात एकूण 294 जागांसाठी मतदान झाले. ही निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली. मात्र, येथील 294 जागांपैकी शिवपूर या मतदारसंघाची विशेष चर्चा होती. येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने (TMC) माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांना मैदानात उतरवलं होतं. तर भाजपकडून येथे रतीन चक्रवर्ती यांना विधानसभेचं तिकीट मिळालं होतं. या निवडणुकीत मनोज तिवारीन यांनी रतीन चक्रवर्तींचा 32 हजार मतांनी पराभव केला.

दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मनोज तिवारी यांना क्रीडा व युवक राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी क्रिकेटपटू मनोज तिवारी आपल्या पत्नीसमवेत टीएमसीमध्ये दाखल झाले होते. भारतीय जनता पक्ष लोकांमध्ये फूट पाडून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. जोरदार प्रचारानंतर त्यांनी निवडणूक जिंकत आमदारकी मिळवली, त्यानंतर आता त्यांना राज्यमंत्रीपद देखील मिळालं आहे.

Google Ad

मनोज तिवारी यांची क्रिकेट कारकीर्द
मनोज तिवारी भारतीय संघांसाठी 12 एकदिवसीय तर 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांत त्यांनी 287 धावा जमवल्या आहेत. त्यामध्येही एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. 104 ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.

आयपीएलमधील कामगिरी
मनोज तिवारी यांना 98 आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये त्यांनी 28.72 च्या सरासरीने 1695 धावा जमवल्या. आयपीएलमध्ये त्यांचा सर्वाधिक स्कोर 75 इतका आहे. आयपीएलमध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!