Google Ad
Editor Choice india

खूशखबर ! केंद्र सरकार देत आहे 2 लाख रुपयांच बक्षिस , 30 जूनपूर्वी करावं लागेल हे काम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२०जून) : केंद्र सरकार लोकांना खासकरुन तरुणांना 2 लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. ही रक्कम जिंकण्यासाठी तुम्हाला एका स्पर्धेत सहभागी व्हावं लागणार आहे. सरकारने लोकांनी तंबाखू (Tobacco) सेवन करू नये, याबाबत जागरुकता पसरावी यासाठी एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. अशा अनेक स्पर्धांचं आयोजन सरकारकडून केलं जातं.

वाचा कशाप्रकारे जिंकाल 2 लाख रुपये

Google Ad

सरकारने एका अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. 2 लाख जिंकण्यासाठी तुम्हाला एका स्पर्धेत सहभागी व्हावं लागेल. जाणून घ्या या स्पर्धेविषयी…

बनवावी लागेल शॉर्टफिल्म
तुमच्याकडे जर शॉर्टफिल्म बनवण्याची (Short-film Contest) कला असेल, तर ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. आंतरराष्ट्रीय तंबाखू निषेध दिवस 2021 (World No-Tobacco Day 2021) या दिवसानिमित्त तुम्हाला तंबाखूच्या दुष्पपरिणामांबाबत शॉर्टफिल्म बनवावी लागेल. ही शॉर्टफिल्म कमीतकमी 30 सेकंद आणि जास्तीत जास्त 60 सेकंद असावी लागेल.

कोण घेऊ शकतं स्पर्धेत भाग?
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक वगळता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक/भारतीय नागरिक (31 मे 2003 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
काय आहे बक्षिसाची रक्कम?
1st Prize: 2,00,000/-
2nd Prize: 1,50,000/-
3rd Prize: 1,00,000/-
उत्तेजनार्थ पुरस्कार- 10000 रुपये दहा व्यक्तींना देण्यात येतील.

या लिंकवर करा क्लिक
तुम्हाला अधिक माहिती https://www.mygov.in/task/short-film-making-contest या वेबसाइटवर मिळेल.
या आहेत महत्त्वाच्या तारखा
स्पर्धा सुरू झाल्याची तारीख- 31 मई, 2021
शेवटची तारीख- 30 जून, 2021

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!