महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ सप्टेंबर) : इन्स्टाग्राम हे सगळ्यात लोकप्रिय सोशल मीडिया अॅपपैकी एक आहे. यावर असणारं रील्स फीचर्स हे यूजर्सना विशेष आवडतं. कित्येक यूजर्स स्वतःही रील्स बनवत असतात तर कित्येक इन्फ्लुएन्सर्स या माध्यमातून तगडी कमाई देखील करतात. तुम्हालाही इन्स्टावर रील्स बनवणं आवडत असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
मेटा कंपनी इन्स्टावरील क्रिएटर्ससाठी एक नवीन फीचर्स आणणार आहे. यामुळे रील्सची वेळ ही 3 मिनिटांवरून तब्बल 10 मिनिटं होणार आहे. या संदर्भात इंस्टाग्रामची चाचणी सुद्धा सुरू आहे. आजकाल अनेकजण इंस्टाग्रामवर विविध पद्धतीचे कंटेन्ट करून शेअर करत असतात. पण आता दहा मिनिटांची वेळ मर्यादामुळे विविध विषयांवर अधिकाअधिक माहिती देणे सोपे होणार आहे.

यासंदर्भात Alessandro Paluzzi या रिव्हर्स इंजिनिअर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून इंस्टाग्रामच्या या अपडेटविषयी माहिती दिली आहे. तसेच इंस्टाग्राम रील मर्यादा 10 मिनिटांपर्यंत वाढवून TikTok ला टक्कर देण्याचा प्रयत्न सुरु आहे. इंस्टाग्रामच्या या निर्णयामुळे रिल्स स्टारला देखील मोठा फायदा होणार आहे.