Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव मधील राजमाता जिजाऊ उद्यानात मंगळवार पासून रंगणार सोनेरी-चंदेरी, ‘दिवाळी पहाट’ … रसिकांना मिळणार यंदा या विविध कार्यक्रमांची मेजवानी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑक्टोबर) : अंगणात आकर्षक रांगोळी, आकाश कंदील, दिव्यांची रोषणाई व सोबत फराळाचा आस्वाद घेता येणारा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या उत्सव काळात आमदार ‘लक्ष्मण पांडुरंग जगताप’ यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे पिंपळे गुरव मधील राजमाता जिजाऊ उद्यानात मंगळवार ०२नोव्हेंबर ते ०४ नोव्हेंबर पर्यंत दररोज पहाटे ०५.३० ते सकाळी ०८.०० वा. पर्यंत पिंपरी चिंचवडवासीयांना ‘दिवाळी पहाट’ च्या माध्यमातून विविध खमंग कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

▶️अशी असेल चंदेरी-सोनेरी दिवाळी पहाट मेजवानी

Google Ad

🔴आयुष्यावर बोलू काही
सादरकर्ते :- सलील कुलकर्णी, संदीप खरे
मंगळवार दि . ०२/११/२०२१ रोजी पहाटे ५.३० ते ८.०० पर्यंत

🔴स्वर पहाट
सादरकर्ते :- प्रथमेश लगाटे सुप्रसिद्ध गायक ( सा रे ग म प लिटिल चॅम्प झी मराठी )
विनल देशमुख, श्रावनी महाजन सुप्रसिद्ध गायक ( विजेता भी हो सुनसार स्टार प्रवाह ( सुप्रसिद्ध नायिका ) रुपाली घोगरे ( सुप्रसिद्ध गायिका )
बुधवार दि . ०३/११/२०२१ रोजी पहाटे ५.३० ते ८.०० पर्यंत

🔴स्वर बहार
सादरकर्ते :- नितीन कदम ( सुप्रसिद्ध गायक )
रोहिणी पांचाळ ( घोड़ेकर ) ( सुप्रसिद्ध गायिका ) अमोल देशमुख ( सुप्रसिद्ध गायक )
गुरुवार दि . ०४/११/२०२१ रोजी पहाटे ५.३० ते ८.०० पर्यंत

पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी रांगोळी स्पर्धांचे, किल्ले बनविणे, आकाश कंदील बनविणे अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले असून, दिवाळी पाढव्याच्या दिवशी (०५ नोव्हेंबर) रोजी सर्व धार्मिक स्थळांवर दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. दिवाळी साहित्याने बाजारपेठा सजल्या असून, ग्राहकांची खरेदीसाठी लगबग वाढली आहे.

▶️बाजारपेठेत लगबग वाढली

पिंपरी चिंचवडमध्ये दिवाळी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. रांगोळी, रांगोळी स्टिकर, पणत्या, आकाश कंदील खरेदीसाठी नागरिकांची दुकानदारांसोबत किंमत कमी करण्यासाठी घासाघीस होत आहे. कंदील खरेदीमुळे इलेक्ट्रिक वस्तूंची मागणीही वाढली आहे. विविधरंगी बल्ब, तोरण, वायर, होल्डर खरेदी केली जात आहेत. त्याचबरोबर रेडीमेड फराळही विक्रीसाठी उपलब्ध असून, नोकरदार महिलांनी आगाऊ ऑर्डर देऊन या फराळाची बुकिंग केली आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या फराळालाही मागणी वाढली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

46 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!