महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ सप्टेंबर) : दर आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कमी झालेला सोन्याचा भाव या आठवड्यात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सोने खरेदीदारांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,४८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७४,८२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,४३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,५२३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,४८० प्रति १० ग्रॅम आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…