Categories: Editor Choice

परमेश्वराने कार्यकर्त्यांचे गाऱ्हाणे ऐकले … महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या प्रकृती स्वस्थाकरीता अनेकांची देवाला प्रार्थना!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ एप्रिल) : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन अमेरिकेतून आणण्याची गरज होती. त्यासाठी अनेकांनी राजकारण बाजूला ठेवून विशेष प्रयत्न व पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. अडचणीच्या काळात सर्व नेते पक्षभेद विसरून एकमेकांच्या मदतीसाठी धावतात, याचा अनुभव सर्वाना पहायला मिळाला. राजकारणात एकमेकांच्या विरोधात असले तरी आदर व आपुलकीच्या भावनेमुळे भाऊंवर असणाऱ्या जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे दर्शन पिंपरी-चिंचवडमध्ये घडले. त्याला कारण आहे, तो लक्ष्मण जगताप यांचा स्वभाव …

चिंचवड ईस्ट पोस्ट ऑफिस या ठिकाणी नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज संघटनेच्या वतीने सर्व टपाल कर्मचा-यांनी प्रार्थना केली. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महिला, विविध संघटना आणि पदाधिकारी प्रार्थना करीत आहेत.

आज पिंपरी चिंचवड शहरातील अनेकांनी वाई येथील महागणपती , साईबाबा (प्रतिशिर्डी), कोल्हापूर येथील महालक्ष्मी, जोतिबा , बाळूमामा, तुळजापूरची भवानीमाता, भीमाशंकर, गोकर्ण महाबळेश्वर, शिर्डीचे साईबाबांच्या चरणी कार्यकर्त्यांनी भाऊंच्या दीर्घायुष्य करीता अभिषेक करून प्रार्थना केली. तर महिला भगिनींनी अथर्वशीर्ष पठण करून आपल्या भावा (लक्ष्मणभाऊ) करीता परमेश्वराकडे निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली.

गेली आठ दिवस झाले, सर्व कार्यकर्ते महिला भगिनी आपल्या लाडक्या नेत्याकरिता परमेश्वराकडे प्रार्थना करत आहेत. लक्ष्मण भाऊंचा चाहता वर्ग संपूर्ण शहरात आहे, प्रत्येकाने आपल्या लाडक्या नेत्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत नेता आणि कार्यकर्त्याच्या नात्यातील निरपेक्षतेचे दर्शन घडवले.

▶️जनतेचा आशीर्वाद आणि प्रार्थना :

आपल्या सर्वांच्या प्रार्थना लक्ष्मणभाऊंना व आम्हाला शक्ती देत आहेत . सर्वांच्या शुभेच्छा, प्रार्थना व आशीर्वादाने तुमचे सर्वांचे लाडके भाऊ शहरवासीयांची सेवा करण्यासाठी पुन्हा लवकरच रुजू होतील असे त्यांच्या कुटूंबियांनी यावेळी बोलताना सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

7 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

15 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago