Google Ad
Editor Choice Maharashtra

पिंपरी चिंचवड शहरातील सोसायट्यांसह नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण करा … मनसेची आयुक्तांकडे मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४जुलै) : राज्यात कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने राबविण्याची गरज आहे . शहरात सध्या वेगवेगळ्या भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत . त्याचप्रमाणे मोहिम तीव्र स्वरुपात राबवून नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण करावे , अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे . दररोज लस केंद्रावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात गर्दीला सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेचे नियोजन कोलमडत आहे . तिस – या लाटेला सामोरे जात असताना प्रत्येक नागरिकाला प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे . त्यामुळे लसीकरण मोहीम तीव्र स्वरुपाची करावी .

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच सोसायट्या , कॉलन्या , चाळी , झोपडपट्ट्या आदी लोकवस्तीमध्ये जाऊन लसीकरण करण्यात यावे . अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले , रुपेश पाटेकर , मयूर चिंचवडे , दत्ता देवतासे , विशाल मानकरी , सुरेश सकट , राजू भालेराव , अनिता पांचाळ , स्नेहल बांगर , अश्विनी बांगर यांनी केली आहे .

Google Ad

कोरोना च्या संसर्गामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत . पण लसीकरणाबाबत महापालिकेचे नियोजन कोलमडत असल्याचा माझा आरोप आहे . त्यामुळे महानगरपालिकेने नागरीकांना धिर देऊन विश्वासात घेऊन घरोघरी जाऊन लसीकरण करावे . अशी आमची मागणी आहे.

सचिन चिखले
शहराध्यक्ष/गटनेता :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना , पिंपरी – चिंचवड महानगरपालिका 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!