!! दिव्यत्वाची जेथ प्रचिती,
तेथे कर माझे जुळती!!
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जुलै) : डॉ.पंकज महाराज गावडे श्री क्षेत्र भंडारा डोंगर यांनी केंद्रीय मंत्री, नितिन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी तब्बल ३५ मिनिटांची अविस्मरणीय भेट घेतली. या वेळी गडकरी यांनी पंकज महाराज गावडे यांना स्वाक्षरी करून त्यांचे एक पुस्तक भेट म्हणून दिले व कापडी चिंध्या या वेस्ट मटेरियल पासून बनवलेली उबदार सतरंजी पूजा, ध्यान करण्यासाठी भेट दिली.
यावेळी पंकज महाराज गावडे यांना भावलेले नितीन गडकरी त्यांच्या शब्दांत :
“नितिनजी इतके कुशाग्र, बुद्धिमान, अभ्यासु, शिस्तप्रिय, दिलदार, अनेक क्षेत्रातील प्रचंड ज्ञान, जगाचा अभ्यास, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारी दृष्टी, वेगवेगळ्या परंपरा या विषयी त्यांची श्रद्धा, विनम्रता, बोलण्यातला आपलेपणा त्याला संयमाची किनार, नाविन्य पूर्ण कल्पना समजून घेण्याची प्रबळ इच्छा आणि सर्वात महत्त्वाचे समाधान, आनंद आणि देशहित यावर कार्य तत्पर असणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची पुढील प्रवासासाठी फ्लाईट असताना, महत्त्वाचे लोक भेटायला आले आहेत हा निरोप बैठकीच्या खोलीत आला असताना देखील त्यांनी दिलेला ३५ मिनिटांचा वेळ खूप काही शिकवून गेला आणि मोठी माणसं मोठी का असतात हे पुन्हा समजले. या वेळी त्यांनी स्वतः हा च्या हाताने आमचे नाव टाकून त्यावर सस्नेह भेट असे लिहून त्यांचे “अनमास्किंग इंडिया” हे पुस्तक सही करून दिले आणि जुन्या कपड्यांच्या किंवा नवीन तागे याच्या वाया जात असलेल्या चिंध्या त्यापासून उत्कृष्ठ, उबदार, मजबूत व टिकावू अश्या पर्यावरणपूरक दोन सतरंज्या ज्या वजनदार आहेत अश्या दोन वस्तू योगी निरंजननाथ आणि मला त्यांच्या शुभ करकमलांनी भेट म्हणून दिले.
हे पुस्तक नक्की वाचा आणि जगाला त्यातील गोष्टी तुमच्या माध्यमातून समजुद्या आणि ध्यान, पूजा, अभ्यास करण्यासाठी या उबदार सतरंजी चा वापर नक्की करा हे ही सांगायला ते विसरले नाहीत. या प्रसंगी योगी निरंजननाथ महाराजांनी माझा विशेष परिचय त्यांना करून दिला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव मी आदराने टिपत होतो. या वेळी आमच्या सोबत आलेले जगप्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू जी मनोहर यांचा आणि नितिन जी यांचा आहार या विषयावरील संवाद देखील खूप अभ्यासपूर्ण आणि स्वादिष्ट होता या वेळी मी साहेबांना म्हणालो साहेब आता तुमचा या ही क्षेत्रात इतका अभ्यास आहे मग हे ही मंत्रालय तुमच्याकडेच घ्या म्हणजे देश हिताचे निर्णय होतील असे मी म्हंटल्यावर तेथे एकच हशा पिकला आणि गडकरी साहेबांनी देखील मनमोकळी दाद दिली.
योगी निरंजननाथ यांनी ही त्यांच्या कार्याचा परिचय दिला यावेळी आम्हां दोघांबद्दल त्यांना समाधान वाटले म्हणून त्यांनी ती पुस्तके आणि सतरंजी जी त्यांनी दत्तक घेतलेल्या गावत महिला बनवतात आणि हा नॅशनल प्रोजेक्ट आहे जो पर्यावरण पूरक आणि रोजगार देणार आदर्श प्रकल्प म्हणून त्याकडे पाहिले जाते त्यात तयार होणारी वस्तू भेट म्हणून दिली याचे खूप समाधान वाटले.
निघताना साहेबांना श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील आणि त्यांचे विश्वस्त लोक वर्गणी मधून निर्माण करत असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिरासाठी त्या ठीकणी तुम्ही पाहणी करण्यास आलात तर तुमच्या नाविन्यपूर्ण दृष्टीने आम्हाला सुंदर मार्गदर्शन प्राप्त होईल कारण त्या ठिकाणी महाराष्ट्राची अस्मिता उभी राहत आहे आणि पुढील पिढ्यानपिढ्या हे कार्य टिकणारे आहे त्यात तुम्ही नक्कीच मार्गदर्शन करण्यासाठी यावे हा हट्ट मी केल्यावर त्यांनी ही मी नक्की येईल संपर्कात राहू आणि वेळ ठरवू हा दिलासा दिला हा खूप महत्वाचा क्षण नक्कीच आहे असे मला वाटते.
खरेतर विश्व हिंदु परिषदेचे विदेश विभाग (आंतरराष्ट्रीय) प्रमुख तथा केंद्रीय मंत्री मा.श्री नितीनजी गडकरी साहेब यांचे अतिशय सलोख्याचे, घरचे ज्यांच्या समवेत सबंध आहेत ते देशाचे माजी शास्त्रज्ञ साहेबांच्या अनेक प्रोजेक्ट मधील वित्तीय सल्लागार डाॅ.हेमंतजी जांभेकर यांच्या नियोजन आणि विनंतीनुसार आणि माझे मित्र योगी निरंजननाथ गुरू शांतीनाथ , अखिल भारतीय श्रीनाथयोगी महासभा – सचिव यांच्या आग्रहामुळे एक अविस्मरणीय भेट घडून आली या साठी या दोघांचे आणि आमच्या समवेत आपला व्यस्त वेळ असताना ही उपस्थित असणारे मास्टर शेफ विष्णू जी मनोहर यांचे मनःपुर्वक आभार व्यक्त करतो आणि ही ऊर्जा देणारी ही भेट माझ्या संपूर्ण जिवनातील ज्या काही महत्त्वाच्या भेटी झाल्या आहेत त्यातील ही एक सुवर्ण भेट नक्कीच समजतो आणि ही सर्व जगद्गुरु संत तुकोबाराय यांची कृपा समजतो.
*चला बदलूया राष्ट्र घडवूया..!*
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…