Google Ad
Uncategorized

गोल्डमॅन ‘प्रशांत दादा सपकाळ’ फाउंडेशनतर्फे बाबुरावजी घोलप महाविद्यालयास व्हीलचेअर भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवी येथील गोल्डमॅन प्रशांत दादा सपकाळ फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता दोन व्हीलचेअर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयास भेट देण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी – चिंचवड विभाग शहर प्रमुख मा. तुषार कामठे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका मा. सुलक्षणा शीलवंत, गोल्डमॅन प्रशांत दादा सपकाळ फाउंडेशनचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा. प्रशांत सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मा. प्रशांत सपकाळ यांनी सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती आपले उत्तरदायित्व लक्षात घेता दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ही मदत करत असल्याची भावना व्यक्त करत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे नमूद केले.

Google Ad

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी गोल्डमॅन प्रशांत दादा सपकाळ फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल प्रशांत सपकाळ यांचे अभिनंदन करत या व्हीलचेअर बद्दल आभार व्यक्त केले.याप्रसंगी महाविद्यालयाच्या सकाळ सत्र प्रमुख पिंपळे मॅडम, डॉ संगीता जगताप, श्री विजय घारे, सोनल कदम ,डॉ ढगे सर, शितोळे मॅडम, विशाल तळेकर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!