Categories: Editor Choice

पिंपळे गुरव मध्ये एमएनजीएलच्या गॅस पाईपलाईन मधून गॅस गळती ; पाचव्या दिवशीचा गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांना रस्ता बंद झाल्याने विलंब झाला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४सप्टेंबर)  : पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव भागातील कृष्णा चौकापासून नर्मदा गार्डनच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबीचे खोदकाम सुरू होते. त्यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने खोदकामाचा राडारोडा उचलत असताना सिमेंटचा थर असलेला दगड गॅस पाईपलाईन वर पडला. त्यामुळे एमएनजीएलची गॅस पाईपलाईन तुटली. तुटलेली गॅस पाईपलाईन मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याने अनर्थ टळला. कामकाज सुरू असताना एमएनजीएलची गॅस पाईपलाईन लाईन सुरू होती. त्यामुळे गॅस गळती होऊन गॅसचा प्रेशर मातीच्या ढिगाऱ्यात वेगाने बाहेर पडत असल्याने मोठा आवाज येत होता. यावेळी येथील नागरिकांनी तसेच कामकाज करीत असलेल्यांनी सतर्कता बाळगत दोन्ही बाजूचा रस्ता बॅरिगेड लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यावेळी परिसरातील नागरिकही भयभीत झाले होते.

यावेळी परिसरातील नागरीक आणि स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, शंकर ननावरे यांनी रहाटणी तसेच वल्लभनगर येथील अग्निशामक दलाला फोनवर संपर्क करून कळविले. तसेच एमएनजीएलच्या कर्मचाऱ्यांनाही फोनवर संपर्क करून कळविले. अवघ्या पंधरा मिनिटात दोन्ही अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. यानंतर लगेचच एमएनजीएलचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सर्व प्रथम एमएनजीएलच्या कर्मचाऱ्यांनी गॅस पाईपलाईनचे मेन कनेक्शन बंद केले. कालांतराने गॅस गळती थांबली व गॅस गळतीमुळे येणारा आवाजही बंद झाला.

महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या खोदकामाच्या कामामुळे दिवसेंदिवस येथील नागरीकांचे जीव धोक्यात येऊ लागले आहेत. याच रस्त्यावर एमएनजीएलची पाईपलाईन फुटून गॅस गळती होणे ही दुसऱ्यांदा घटना घडली असून पिंपळे गुरव मध्ये सहा महिन्यात नऊ वेळा गॅस गळतीची घटना घडून गेली आहे. अनेकदा घटना होत असूनही कोणतीही काळजी न घेता निष्काळजीपणा दाखवत कामकाज केले जात आहे. यावेळी कोणतीही दखल घेत नसल्याचे दिसून येते. एमएनजीएलचे कर्मचारीही कामकाज सुरू असताना उपस्थित नसल्याचे दिसून येते.

कृष्णा चौक येथून नर्मदा गार्डनच्या दिशेने जाताना एम एच १४ फूड कोर्ट जवळ रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत खोदकाम सुरू होते. सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी जेसीबीच्या साहाय्याने राडारोडा उचलत असताना राडारोड्या वर सिमेंटकाँक्रीटीकरणाचा असलेला दगड एमएनजीएलच्या पाईपलाईन वर पडला. यावेळी मुख्य पाईपलाईन मधून घरगुती गॅस कनेक्शन जोडण्यात आलेल्या पाईपलाईन वर पडल्याने गॅस पाईपलाईन तुटली.

एमएनजीएलचे मुख्य कनेक्शन मातीच्या ढिगाऱ्यात अडकून पडल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याने मोठा आवाज येत होता. अर्धा तास हा आवाज सुरू होता. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. परिसरातील नागरिक भयभीत होऊन रस्त्याच्या कडेला गर्दी करून उभे होते. एमएनजीएलच्या कर्मचाऱ्यांनी मेन कनेक्शन बंद केल्यावर अखेर आवाज बंद झाला आणि नागरिकांनी श्वास सोडला.

परिसरातील काही नागरिक पाचवा दिवस असल्याने गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडत असतानाच अचानक गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे नागरिकांसाठी तसेच वाहतुकीसाठी येथील रस्ता बंद करण्यात आला होता. लाडक्या गणरायाला निरोप देत असताना विघ्न आले. त्यामुळे गणपती बाप्पाला निरोप देण्यास बराच विलंब होत होता. अखेर विघ्न दूर होताच गणपती बाप्पाला सायंकाळी पाऊने सातच्या दरम्यान रस्ता खुला करण्यात आल्या नंतर निरोप करण्यात आले.

सिमेंटचा थर असलेला दगड व मातीचा ढिगारा जेसीबीच्या साहाय्याने उचलत असताना सिमेंटचा थर असलेला दगड एमएनजीएलच्या गॅस पाईपलाईन वर पडला. त्यामुळे गॅस पाईपलाईन तुटून गॅस गळती सुरू झाली. एमएनजीएलच्या कर्मचाऱ्यांना कळविले आहे. एक तासाच्या आत गॅस गळती बंद होईल तसेच गॅस पाईपलाईनचे कामकाज पूर्ववत सुरू होईल.
विजय बांदल, स्मार्ट सिटी अधिकारी

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

6 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

13 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago