Categories: Uncategorized

मुंबई पुणे हायवेवर ट्रकमधुन लोंखडी सळई चोरणारी टोळी जेरबंद … १९ लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत लिंबफाटा, तळेगाव दाभाडे, पुणे येथे आले असता, खंडणी विरोधी पथकाचे वपोनि अरविंद पवार यांना मिळालेल्या बातमी वरुन, तळेगाव दाभाडे गावचे हद्दीत जुना मुंबई-पुणे हायवे लगत असणाऱ्या हॉटेल रांगडा दरबारचे मागील मोकळ्या जागेत ता. मावळ, जि.पुणे येथे खंडणी विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन  कारवाई करण्यात आली.

या कारवाईत निजाम नवाब खान वय ५८ वर्षे रा. सध्या पप्पु खळदे यांची खोली, हॉटेल रांगडा दरबारचे मागे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे मुळगाव- रहिमानिया मस्जिदजवळ कमलारमननगर, बैंगणवाडी, गंवडी, मुंबई २ ) शत्रुघन महाबल ठाकुर वय ६० वर्षे रा. सुजा वेंचर सोसासटी, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, पुणे मुळगाव-पुराबजार, तहसिल सदर, जि. आयोध्या, उत्तरप्रदेश ३ ) इसराल अहमद आबेदअली शेख, वय – ३२ वर्षे रा. सध्या पप्पु खळदे यांची खोली, हॉटेल रांगडा दरबारचे मागे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे मुळगाव-बैराहपुर, तहसिल फत्तेपुर, उत्तरप्रदेश ४ ) महंमद आरीफखान वय ४० वर्षे रा.अह रहेमान ट्रान्सपोर्ट, शालीमार हॉटेल समोर, जलील कंपाऊड धारावी. मुंबई मुळगाव- कुरही, तहसिल बबेरु, जि.बांधा, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवुन,

त्यांचेकडून ३,७८,६००/- रु. किंमतीचे ६३१० किलो वजनाचे चोरी केलेले लोखंडी सळईचे बंडल व चोरीचा माल घेवुन जात असलेला १५,००,०००/- रू किंमतीच्या टाटा ११०९ ट्रकनं. एमएच ४३ वाय ७८२८ असा एकुण १८,७८,६००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन, त्यांचे विरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १९९ / २०२३ भादवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे हे करत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…

2 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

2 weeks ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

3 weeks ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

3 weeks ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

2 months ago