Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कर्तव्य तत्परता : आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वतः उभे राहून २ तासात करून घेतला रस्ता …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४जुलै) : पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी येथील सव्हें नंबर ४३ मधील नियोजित १८ मीटर रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून होत न्हवते . रहाटणीकडून पिंपरीकडे जाण्यासाठी पिंपळे सौदागर येथील पुलाचा वापर केला जातो . त्यामुळे याठिकाणी सतत वाहतूककोंडीच्या समस्याला नागरिकांना सामोरे जावे लागत होते .

या भागातील नागरिक या त्रासाला वैतागले होते, कारण काय तर या १८ मीटर रस्त्यात काही स्थानिक शेतकरी यांच्या जागा गेल्याने त्यांचा या गोष्टीला विरोध होता, कारण त्यांना या जागेचा मोबदला पालिकेकडून मिळायला पाहिजे होता, तो न मिळाल्याने रस्ता करण्यास पालिकेचे ठेकेदार या ठिकाणी गेले असता त्यांना काम न करता त्या ठिकाणहुन हुसकावून देण्यात येत असे त्यामुळेच हा रस्ता अनेक दिवसांपासून रखडला होता.

Google Ad

या भागातील त्रासलेल्या नागरिकांनी अखेर या भागाचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या समोर आपली व्यथा मांडली, आपल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या जगताप यांनी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करून संबंधित जागा मालकांशी चर्चा करून अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या १८ मिटर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला.

स्वतः उभे राहून आमदारांनी या रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिकांना तो वापरण्यायोग्य बनवून दिला आणि राहटणी ते पिंपरी पुलाला जोडणाऱ्या या रस्त्याचा वाहतूक कोंडीतून मार्ग निघाला. तसेच या ठिकाणी असणारे विजेचे खांब आणि पाण्याची लाईन टाकण्याच्या सूचनाही ‘लक्ष्मण जगताप’ यांनी प्रशासनाला दिल्या, आणि विजेचे पोल टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे कामांमुळे त्यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!