Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

चिंचवडचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या विकास निधीतून व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या नियोजनातून … सांगवी पोलिसांना अत्याधुनिक संगणक तसेच प्रिंटरचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ऑगस्ट) : चिंचवडचे आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या विकास निधीतून व माजी नगरसेवक ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या नियोजनातून पोलिसांना अत्याधुनिक संगणक तसेच प्रिंटरचे वाटप करण्यात आले.

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी कोरोना महामारीच्या काळात एक ‘देवदूत’ म्हणून चोवीस तास कार्यरत असणारे पोलीस बांधव हे आपल्या जीवाची बाजी लावून समाजातील प्रत्येक घटकाचे रक्षण करीत होते. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यास मदत तसेच पोलीस ठाण्यातील संगणक क्षेत्र आणखी अत्याधुनिक व्हावे यासाठी सांगवी पोलीस ठाणे, सांगवी पोलीस चौकी, पिंपळे सौदागर पोलीस चौकी या ठिकाणी अत्याधुनिक संगणक व प्रिंटर मशीन देण्यात आले.

Google Ad

याप्रसंगी सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, नगरसेविका शारदा सोनवणे, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष सागर आंघोळकर, नगरसेवक महेश जगताप, संजय मराठे, भाजपा युवती अध्यक्षा सोनम गोसावी, संध्या सूर्यवंशी, संदीप दरेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश कांबळे, पोलीस निरीक्षक संतोष येडे, पोलीस निरीक्षक विनोद शेंडकर आदी पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

या संगणकामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी होईल व आणखीन चांगले काम करण्यास सोपे होईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‘सुनिल टोणपे’ यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

सर्व प्रथम सांगवी पोलीस स्टेशन येथे स्थापन होण्यासाठी व नंतर त्यांना जागा मिळून देण्यापासून आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी आज पर्यंत खुप मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. असे महापौर मा. उषा उर्फ माई ढोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

नवीनच सांगवी येथे रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे हे गुन्ह्याच्या तपासाचा गाढा अभ्यास असलेले कर्तव्य दक्ष अधिकारी असल्याने यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर वचक बसण्याची सांगवी पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या परिसरातील सामन्य नागरिकांच्या अपेक्षा आहेत, आणि ते त्या पूर्ण करतील अशी आशा सामान्य नागरिक बाळगून आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!