Google Ad
Editor Choice

सामाजिक कार्यकर्त्या ‘अर्चना मस्के’ यांच्या कडून … देशाभिमान जपणाऱ्या पोलिस बांधव व अग्निशमन दलाच्या जवानांना रक्षाबंधनाची अनोखी भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .१२ ऑगस्ट) रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! बहीण-भावाच्या अतूट नात्याचा प्रतीक असलेला रक्षा बंधनाचा सण गुरुवारी (दि. ११ ऑगस्ट) पुणे शहरातील कोथरूड पोलिस स्टेशन येथे दिवांकुर सा.संस्था व छावा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व सण शांततेत व उत्साहात पार पडावे यासाठी मेहनत घेणाऱ्या पोलिस बांधवांना आणि अग्निशमनचे जवान यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. कोरोनामुळे दोन वर्षा नंतर रक्षाबंधन साजरा करण्याची भाऊ-बहिणींना संधी मिळाली. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना.

तिकडे महिला भगिणींनी पोलीस अधिकार्‍यांना राखी बांधली तर पोलिसांनी बहिणींना ओवाळणीत रक्षण करण्याचे वचन भेट म्हणून दिले. अनेक मुस्लीम तरुणींनी हिंदू भावना तर हिंदू भगिणींनी मुस्लीम बांधवाना राखी बांधून राष्ट्रीय एकात्मतेचा केवळ संदेशच दिला नाही तर जातीयवाद निर्माण करणार्‍यांना देखील चोख उत्तर दिले.

Google Ad

यावेळी दिवांकुर सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ‘अर्चना म्हस्के’ म्हणाल्या “कर्तव्य बजावताना प्रत्येक सण हा घरापासून दूर राहून साजरा करावा लागत असतो. पोलिस बांधवांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी व मनोबल वाढवण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही महिला भगिनी रक्षाबंधन सारखा सण साजरा करत असतो. तो आमचा देशाभिमान आणि कर्तव्य आहे.

यावेळी दिवांकुर संस्थेचे संस्थापक लक्ष्मण म्हस्के, अध्यक्ष सौ अर्चना म्हस्के, सविता वर्वे,कमल गायकवाड, सुनीता मस्के, दुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राची सोरटे, छावा संघटना पदाधिकारी शीतल हुलावळे, मीना ठुले, मेघना कदम तसेच एरंडवणा अग्नीशमन केंद्राचे कैलास पवार, सचिन आयवळे, अनंत जाधव, ड्रायव्हर अमोल शिंदे , शैलेश दवणे, अनिकेत उत्तेकर, आशितोष पिंगळे, सचिन वाघोले, विठ्ठल सावंत, महेश देशमुख, सागर मदने, राकेश ननावरे उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!