Google Ad
Uncategorized

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून भंडारा डोंगर मंदिरासाठी सव्वाकोटीची देणगी 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ नोव्हेंबर) : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी ऊस बिलातून कपात केलेले एकोणपन्नास लाख चौऱ्याऐशी हजार रुपये व कारखान्यातील सर्व कायम कामगार व हंगामी कामगार यांचे १५ दिवसांचे वेतन पंच्याहत्तर लाख पंधरा हजार रुपये असे मिळून सव्वाकोटी रुपयांचा धनादेश भंडारा डोंगरावर सुरु असलेल्या बांधकामासाठी भंडारा डोंगर मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला.
इथेनॉल प्रकल्प भूमीपूजन व गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे चेअरमन विदुरा नवले, व्हाईस चेअरमन बापूसाहेब भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, शांतीब्रम्ह ह.भ.प. मारोती महाराज कुऱ्हेकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे, सर्व संचालक मंडळ व कामगार प्रतिनिधी यांचे हस्ते भंडारा डोंगर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद व पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, ट्रस्ट तर्फे संत तुकाराम महाराज पगडी, मंदिर प्रतिकृती, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी सांगितले, की सध्या मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर असून, बांधकाम स्लॅब लेव्हलपर्यंत आले आहे. या बांधकामासाठी अंदाजित दीडशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ट्रस्टला देणगी मिळत आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मिळालेल्या  देणगीची मंदिराच्या बांधकामासाठी मोठी मदत होणार आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे येऊन मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

भंडारा डोंगरावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने दिलेल्या देणगीबद्दल संचालक, सभासद व कामगारांचे कौतुक आहे. तसेच भंडारा डोंगर मंदिरासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे.
– शांतीब्रम्ह ह.भ.प. मारोती महाराज कुऱ्हेकर

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!