Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर’ आजाराने ग्रस्थ पिंपळे गुरव च्या ११ वर्षाच्या ‘रिदम शहा’ च्या आयुष्याला आटोमॅटिक व्हील चेअरच्या रूपाने मित्रांनीच दिला आधार!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव येथील सहकार नगर मधील ‘रिदम अक्षय शहा’ या मुलाला muscular disorder या नावाचा आजार आहे. त्याचे आयुष्य फार अल्पायुषी आहे. त्याचे शरीर कमरेपासून पायापर्यंत लुळे पडले आहे. पुढील काळात हा आजार कमरे पासून माने पर्यंत पोहचल्यानंतर त्याच्या आयुष्याचा शेवट होणार आहे. असे त्याचे वडील अक्षय शाह, आई सारिका शाह यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यास सांगितले . ही घटना सांगितल्यावर ऐकणाऱ्याचे मन हेलवल्याशिवाय राहू शकत नाही. सहकारी रमेश बागमर यांना ही घटना स्वस्थ बसू देईना, त्यांनी आपल्या मनात असलेलं काहूर शांत करण्यासाठी मनातली गोष्ट व्हाट्सअप्पच्या माध्यमातून आपल्या मित्रांशी शेअर केली.

मित्रांनीही परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन एकमताने होकार दिला आणि सर्वांनी खारीचा वाटा उचलून मदत करण्याचा निश्चय केला, आणि हा हा म्हणता पैशाच्या स्वरूपात काही मदत जमा झाली आणि रिदम ला आपण समाधान देऊ शकू त्याला इतर मुलांच्या प्रमाणे आपले राहिलेले आयुष्य जगता येईल असे वाटू मदत जमविणाऱ्यांना वाटू लागले.

Google Ad

आणि तो दिवस आला, पिंपळे गुरव येथील सहकार नगर मधील रिदम अक्षय शहा हा ११ वर्षांचा असून muscular disorder या नावाच्या आजारास झुंज देत आहे. सध्या त्याच्या शरीराचा पायापासून कमरेपर्यंतचा भाग निकामी झाला आहे. त्याला उचलून ठेवावे लागते. तो इतरांसारखे खेळू शकत नाही, बागडू शकत नाही यासाठी सतत रडत असतो. हे त्याचे रडणे हसण्याच्या रुपात दिसले , त्यास आटोमॅटिक व्हील चेअर देऊन त्याला ती चालविण्यास लावली, काय होता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद … शब्दांत सांगणे कठीण आहे.

रिदमचे वडील अक्षय शाह एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असून जेमतेम उदरनिर्वाह होण्याईतपत पगार आहे. रिदमच्या औषधांचा खर्च दरमहा ५००० रुपये इतका आहे. आर्थिक परिस्थिती बिकट आहे. यासाठी मुलाचे दुःख तर दूर करता येत नाही. पण उरलेल्या अल्प आयुष्यात आनंद देण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने पीसीएमसी जैन साधू साध्वी विहार सेवा ग्रुप व भारत इंग्लिश स्कूल १९८७ माजी विद्यार्थी व मित्र परिवार यांच्या संयुक्त दानशूर दात्यांच्या योगदानातून रिदम यास ही ऑटोमॅटिक व्हील चेअर देण्यात आली.

ही कल्पना पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, संघ स्वयंसेवक पदाधिकारी रमेश बागमार व आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींचे चोपदार राजाभाऊ यांच्या प्रयत्नातून रिदम यास ऑटोमॅटिक व्हील चेअर देण्यात आली. तसेच यापुढील प्रत्येक महिन्याचा पाच हजार औषधोपचाराचा खर्च पीसीएमसी जैन साधू साध्वी विहार सेवा ग्रुपचे प्रमुख संतोष लुंकड व रमेश बागमार यांनी ती जवाबदारी घेतली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!