महाराष्ट्र व14 न्यूज, (दि.३० एप्रिल) : हर घर दुर्गा अभियान साजरे करताना दि. २४ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधी मध्ये भारतीय संस्कृती मंच आणि मणिकर्णिका प्रतिष्ठान यमुनानगर निगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत महिला शौर्य प्रशिक्षण पार पडले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तात्या बापट स्मृती समितीच्या ग्राम विकास प्रांत मंडळ सदस्या, कुटुंब समुपदेशन व विवाहपूर्व मार्गदर्शक प्राध्यापिका निवेदिता काच्छावा उपस्थित होत्या. प्रशिक्षक म्हणून सिलंबम अंतरराष्ट्रीय विजेते श्री विजय टेपगुडे सर यांनी महिलांना खूप प्रभावी प्रशिक्षण दिले.
प्राध्यापिका निवेदिता कच्छवा यांनी महिलांचे स्वसंरक्षण आणि सामाजिक भान यावर व्याख्यान दिले , तसेच पिंपरी चिंचवड मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या फड यांनी महिलांना सुरक्षित कसे राहावे या बाबत संदेश दिला. सर्व प्रशिक्षणार्थी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत अत्यंत सुंदर लाठी काठी चे प्रत्यक्षिक केले. श्री. नंदकुमार (आप्पा) कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारतीय संस्कृती मंच व मणिकर्णिका प्रतिष्ठान याची माहिती दिली. तसेच अंतरराष्ट्रीय योगशिक्षक श्री. चंद्रकांत पांगारे यांच्या विद्यार्थींनी विविध प्रकारच्या योगासनांची प्रात्यक्षिके दिली. या शिबिरामध्ये सुमारे ५०० प्रशिक्षणार्थीं महिला सहभागी झाल्या होत्या.
या प्रसंगी काही महिला खेळाडूंना सन्मानित करण्यात आले त्यात पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छ भारत अभियानाची ब्रॅण्ड अँबेसेडर व शिव छत्रपती पुरस्कार विजेती कबड्डी खेळाडू पूजा शंकर शेलार, केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या विभागात निवड झालेली कासारवाडी येथील धावपटू व रोइंग या क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळवलेली कु. वैभवी गणेश मोटे, रोलबॉल या खेळात राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली वैष्णवी दिनेश कुलकर्णी व सायकलपटू व धावपटू ऋचा जोशी व नेटबॉल या खेळात विद्यापीठ स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेली ज्योती खुडे यांचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदित्य कुलकर्णी, गिरीष देशमुख, मुक्ता गोसावी, शिल्पा नगरकर, शर्मिला ब्रम्हे, मीनल शुक्ल,प्रिया देशमुख, सुजाता मटकर, अनघा काळे, योगिता शाळीग्राम, अदिती धुळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनुष्का वैश्यमपायन यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शर्वरी येरगट्टीकर यांनी केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…