महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जुलै २०२३) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत “दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएलचे मोफत बसपास देणे” आणि “महानगरपालिका हद्दीतील ६० वर्षापुढील अंध व्यक्तीच्या सोबतीस असणा-या व्यक्तीस बस प्रवासाचा मोफत पास” या दोन योजनांअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणा-या गरजूंनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
महापालिकेच्या वतीने समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत विविध योजना कार्यान्वित आहेत. महानगरपालिका हद्दीमध्ये राहणा-या दिव्यांग नागरिकांना तसेच महानगरपालिका हद्दीतील ६० वर्षापुढील अंध व्यक्तीच्या सोबतीस असणा-या व्यक्तीला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता पीएमपीएमएलचे मोफत बसपास देण्याची योजना राबविली जाते. यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज स्विकृतीची मुदत दि. ३१ जुन २०२३ पर्यंत होती. ही मुदत आता १५ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणा-या गरजूंनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकृती उपलब्ध करण्यात आलेली आहे. जुन्या पासधारकांनी त्यांच्याकडील जुने मोफत बसपास कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुणे-मुंबई रोड, पिंपरी या ठिकाणी जमा करावेत, दिव्यांग नागरीकांनी मोफत बसपासचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या मुदतीतच ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावा, असे आवाहन समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.
या दोन्ही योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी योजनेच्या अटी व शर्तीनुसार आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती उपलब्ध करण्यात आली असल्याचेही समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…