Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची संचालक मंडळाची चौदावी बैठक संपन्न … या महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा आणि निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५जून) : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची संचालक मंडळाची चौदावी बैठक आज शुक्रवार, दि.२५/०६/२०२१ रोजी दुपारी ०३.०० वा, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालय, ऑटोक्लस्टर चिंचवड-१९ येथे आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकीसाठी अध्यक्ष म्हणुन श्री.नितिन करीर चेअरमन तथा प्रधान सचिव मा.महापौर श्रीम. उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते श्री.नामदेव ढाके, मा.विरोधी पक्षनेते श्री.राजु मिसाळ, श्री.प्रमोद कुटे, श्री.सचिन चिखले, केंद्र शासनाच्या प्रतिनिधी श्रीम.ममता बात्रा, श्री. राजेंद्र जगताप, मुख्य व्यवस्थापकीय संचालक PMPML, श्री.कृष्ण प्रकाश मा.पोलीस आयुक्त, श्री.राजेश पाटील मा.आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड हे सर्व संचालक सभेस उपस्थित होते.

याव्यतिरीक्त सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजन पाटील व श्री.निळकंठ पोमण, मुख्य वित्तिय अधिकारी श्री.सुनिल भोसले, श्री.अशोक भालकर, जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रकचर, श्री.मनोज सेठीया, कार्यकारी अभियंता सभेस उपस्थित होते.

Google Ad

सदर बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर एकुण ३० विषय होते त्यापैकी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन निर्णय घेणेत आले आहे.

पॅन सिटी प्रकल्पातंर्गत काम करणारे मे.Larsen & Toubro Limited आणि मे.Tech Mahindra Limited यांना कोवीड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाकडील शासन निर्णयानुसार प्रकल्प कामासाठी सहा महिने दंडासह मुदतवाढ देणेकामी मा.संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध स्मार्ट ऐलिमेंन्टस कार्यान्वित करणेकामी Optical Fiber Cable टाकण्याची कार्यवाही चालू असून सदर फायबर केबलव्दारे भविष्यामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार आहे. त्याकामी Fiber Network Monetization & Operations Committee स्थापन करणेत आलेली असून सदर विषयास मान्यता दिलेली आहे.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी च्या म्युनिसिपल ई-क्लासरुम प्रकल्पातंर्गत १०५ शाळांमध्ये बसविण्यात आलेले IT Equipment’s चे सिटी नेटर्वकच्या सहाय्याने ICCC येथे संयुक्तपणे इंटीग्रेशन करणार आहे जेणेकरुन सदर शाळांना Digital Platform प्राप्त होणार आहे. त्यासाठी एकुण र.रु.५.६४ खर्च होणार असून मा.संचालक मंडळाने सदर विषयास मंजुरी दिलेली आहे.

मा.संचालक मंडळाने एबीडी प्रकल्पातंर्गत काम करणारे प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट मे.KPMG Advisory Service Pvt Ltd यांना प्रकल्प कामगिरीच्या आधारावर एक वर्ष मुदतनाढ देणेकामी मान्यता दिलेली आहे.
म्युनिसिपल ई-क्लासरुम प्रकल्पाचे सिस्टीम इंटीग्रेटर यांना कोवीड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सदर प्रकल्प कामासाठी तीन महिने दंडासहित मुदतवाढ देणेकामी मा.संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी चे Skill Development प्रकल्पातंर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे Smart Training & Innovation Center (STIC) यांचेबरोबर सामंजस्य करार करण्यात आलेला असून या करारामुळे पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील उदयोन्मुख उद्योजकांना मार्गदर्शक ठरणार आहे व परिणामी उद्योग वाढण्यास खालीलप्रमाणे मदत होणार आहे.

Enabling Youth Enabling Young Citizens: PCMC enabling employability enhancement for young citizens by giving them job-oriented trainings

Supporting Industry: PCMC extending support for it’s industrial economy by creating manpower for next generation industrial revolution.

Contributing to Atmanirbhar Bharat: Further advantage of demographic dividend by training them with latest skills.

Pioneering Effort: Advance level Capacity Building initiative by Local Self Governance to support economy & citizens can act as a path breaking model
Ensuring the Women

Participation: Special focus on gender equity in tech jobs by running dedicated & sponsored batches for young women.

Creating Global Opportunities for Young Citizens: With Advance training provide support to candidate for the global job opportunities‍

भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयातर्फे सुरु करणेत आलेल्या India Cycles4 change योजनेमध्ये पिंपरी चिंचवड शहाराचा समावेश झालेला असून सदर योजना राबविणेकरीता बीआरटीएस व स्मार्ट सिटी यांच्या योगय् समन्वयाने सदर योजनेची अंमलबजावणी करणेत येणार आहे.

तसेच Non-Motorized Transport Challenge करीता NMT Expert/Cycling Expert श्री.आशिक जैन यांची एक वर्ष कालावधीकरीता सदर कामासाठी नियुक्त करणेच्या विषयास मा.संचालक मंडळाने मंजुरी दिलेली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

85 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!