Google Ad
Uncategorized

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मुंबई शहराचे माजी महापौर, माजी नगरसेवक प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना काल रात्री अचानक अस्वस्थ जाणवू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

त्यांच्या मागे माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, मुलगा प्रसाद, मुलगी प्रांजल असा परिवार आहे. वांद्रे पूर्व टीचर्स कॉलनी जवळील स्वर्गद्वार संयुक्तिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात सायंकाळी 5.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख, आमदार, माजी मंत्री अँड. अनिल परब हे मध्यरात्री पासून त्यांच्या कुटुंबासमवेत होते.

Google Ad

दरम्यान दुपारी त्यांचे पार्थिव त्यांच्या सांताक्रूझ पूर्व ,साईप्रसाद सोसायटी,गोळीबार रोड,तिसरा मजल्यावर त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. मग दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या सांताकृझ पूर्व,पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात ठेवण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घरी जावून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

दुपारी 4.40 मिनीटांनी राजे संभाजी विद्यालयातून फुलांनी सजवलेल्या वैकुंठयान शवाहिनीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.येथून शोकाकूल वातावरणात निघालेली त्यांची अंत्ययात्रा दुपारी 5.10 मिनीटांनी वांद्रे पूर्व, टीचर्स कॉलनी, स्वर्गद्वार संयुक्तिक स्मशानभूमीत पोहचली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांचा पुत्र प्रसाद यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुंबईकरांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!