Google Ad
Editor Choice

Mumbai : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख अखेर तुरुंगाबाहेर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ डिसेंबर) : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची आज बुधवारी तुरुंगातून सुटका झाली. मुंबईतील आर्थर रोड कारागृहाबाहेर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात ते बराच काळ तुरुंगात होते. देशमुख यांची सुटका होण्यापूर्वीच त्यांचे समर्थक तुरुंगाबाहेर उपस्थित होते.

अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. परंतु सीबीआयने जामीनावरील स्थगिती आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी अर्ज दाखल केला, ज्याला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूरी दिली आणि सीबीआयच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात जामीन आदेशावरील स्थगिती 27 डिसेंबरपर्यंत वाढवली होते. मात्र त्याची आणखी तीन दिवसांची मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

Google Ad

अनिल देशमुख यांच्या जामिनात वाढ करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. याचिका फेटाळून लावत न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला. त्यामुळे 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!